चंद्रशेखर घुले यांना जिल्हा बँकेत जे जमले ते दुसऱ्यांना नाही करता आलं

सचिन सातपुते
Monday, 25 January 2021

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज या मतदार संघातून केवळ घुले यांचाच एकमेव अर्ज दाखल असल्याने ते बॅंकेच्या संचालकपदी निवडून येण्याची केवळ औपचारिकताच बाकी आहे. त्यांचे शेवगावमधून जोरदार स्वागत होत आहे. 

शेवगाव : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदासाठी राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपने तर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेत रणनीती आखली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या निवडणुकीत लक्ष घातले आहे. ही बँक जिल्ह्याची कामधेनू मानली जाते.

एकेका जागेसाठी जंगजंग पछाडले जात आहे. शेवगाव सेवा संस्था मतदार संघातून माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा - महाविकास आघाडीसाठी शरद पवार यांनी टाकले फासे

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज या मतदार संघातून केवळ घुले यांचाच एकमेव अर्ज दाखल असल्याने ते बॅंकेच्या संचालकपदी निवडून येण्याची केवळ औपचारिकताच बाकी आहे. त्यांचे शेवगावमधून जोरदार स्वागत होत आहे. 

शेवगाव तालुका सेवा संस्था मतदार संघातून घुले गेली अनेक वर्ष बॅंकेचे संचालक आहेत. तसेच तालुक्‍यातील 70 पैकी बहुतांशी सेवा संस्था घुले यांच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे अनेक दिग्गजांनी बॅंकेच्या संचालकपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली, तरी तालुक्‍यातून घुलेंना कधीही फारसा विरोध होत नाही.

संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल घुले यांचा पंचायत समितीचे माजी सभापती अरुण लांडे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, बबन भुसारी, तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब चेके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. अनिल मडके आदींनी स्वागत केले. 

या निवडणुकीत घुले यांना जे जमले ते कोणालाच नाही करता आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clear the way for the unopposed election of Chandrasekhar Ghule