esakal | अहमदनगर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती

अहमदनगर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ अडचणीत

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नगर : कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, त्यामध्ये बाजार समितीत दोष व अनियमितता आढळून आली. सहकार विभागाच्या चार अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालातही समितीला दोषी ठरविल्याने, त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

नगर तालुका महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत बाजार समितीच्या संचालक मंडळावर हल्लाबोल केला. या संचालक मंडळाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असा दावा नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. हा अपहार मोठा असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी केला. पत्रकार परिषदेत बाळासाहेब हराळ, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, गोविंद मोकाटे, उपसभापती दिलीप पवार, केशव बेरड, रामदास भोर, संदीप गुंड, गुलाब शिंदे, विठ्ठल काळे, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक : जुळ्या चिमुकल्यांसह खाणीत आढळला बेपत्ता पित्याचा मृतदेह


कार्ले म्हणाले, की ही नोटीस महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम १९६३ च्या कलम ४५ अन्वये दिली आहे. त्यामुळे ५० कोटींपेक्षा जास्त अपहार मार्केटमध्ये झाल्याचा दावा केला. आम्ही या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सहकार विभागाकडे दाद मागत होतो, ‘कारणे दाखवा’ नोटीस देणे म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचार सिद्ध होणेच आहे. आणि तो अपहार या समितीतील संचालक मंडळाने आणि सचिवाने केला. नोकरभरती बोगस केली, प्रॉव्हिडंट फंडची चलने खोटी दिली, सफाईचे टेंडर न काढताच बिले अदा करणे, तसेच व्यापाऱ्यांच्या वसुलीकरात तफावत असून, यासह अनेक कामांमध्ये अनियमितता आणि दोष आढळून आले आहेत.

हराळ म्हणाले, की या समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस एक झलक आहे. या समितीतील सर्व कारभाराचे शासनाने ऑडिट करणे गरजेचे आहे. तसे झाले तर हजारो कोटींचा गैरव्यवहार बाहेर येईल. हे संचालक मंडळ शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
गोविंद मोकाटे म्हणाले, की या समितीच्या सत्ताधाऱ्यांनी दूध संघाचे वाटोळे केले. आता बाजार समितीचे वाटोळे सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत सावध होणे आवश्यक आहे. बाजार समितीत येणाऱ्या उसाच्या टेम्पोकडूनही अनधिकृतपणे ५०० रुपये वसुली केली जाते, असे ते म्हणाले.

हेही वाचा: हॉटेल कामगाराचा दगडाने ठेचून खून; हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

loading image
go to top