
संगमनेर: शहर व तालुक्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, अनंत चतुर्थीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन होणार आहे. पर्यावरणपूरक आणि सुरक्षित गणेश विसर्जन व्हावे, यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वात एकवीरा फाउंडेशनतर्फे तब्बल ४०० युवक व युवतींचे स्वयंसेवक विसर्जन सक्रिय कार्यात राहणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. यावर्षीही शहरातील नागरिकांना मदतीसाठी एकवीरा फाउंडेशन सज्ज आहे.