नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा : विखे पाटील

प्रा.रवींद्र काकडे
Wednesday, 9 December 2020

माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सहा कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाल्याने या रस्त्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.

लोणी (अहमदनगर) : नांदूर शिंगोटे ते कोल्हार या लोणी खुर्द मधून जाणाऱ्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सहा कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाल्याने या रस्त्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.

दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या या मार्गाचे काम फेब्रुवारी पर्यत पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करा अशा सूचना माजी मंत्री आमदार विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आमदार विखे पाटील यांनी स्थानिक पदाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत लोणी खुर्द येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहाणी करून महत्वपूर्ण सूचना केल्या. रस्त्याच्या रूंदीकरणासह कारपेट दुभाजक पथदिवे, साईड पट्टय़ा आणि मोरीच्या कामासह रोड फर्निचर आणि थर्मोप्लॅस्टीक पेंटच्या बाबीचा समावेश करून या कामास गती दिली आहे.

रस्ता रूंदीकरणाबरोबरच वीज वितरण कंपनीचे खांब तसेच दूरसंचार निगमचे सहकार्य घेवून इलेक्ट्रिक पोल आणि टेलीफोन डिपी हलविण्याच्या कामाना प्राधान्य देण्याच्या सूचना करत. आडगाव फाटा बाजार समिती उपकेंद्र वेताळबाबा चौक लोणी पोलीस स्टेशन येथे सर्कल टाकण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे लोणी खुर्द काम पूर्ण होत असल्याने देखील वाहतुकीची कोंडी कमी झाली. नांदूर शिंगोटे पर्यत हा मार्ग जोडला गेला असल्याने नासिककडे जाणाऱ्या वाहतुकीलाही मोठी मदत होणार असल्याचे आमदार विखे पाटील म्हणाले.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम, दूरसंचार विभागाचे अभियंते यांच्यासह बापूसाहेब आहेर, जेष्ठ नेते शांतीनाथ आहेर, बाळासाहेब आहेर, संचालक संजय आहेर, भारत घोगरे, डॉ. हरिभाऊ आहेर व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complete the quadrangle of Nandur Shingote to Kolhar road by February