
या सभेच्या प्रारंभी पालिकेसमोर विरोधी गटाने केलेल्या श्राद्ध आंदोलनाचा नगराध्यक्षा आदिक यांनी समाचार घेत. स्व. गोविंदराव आदिक यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.
श्रीरामपूर ः नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी कॉंग्रेसचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली श्राद्ध आंदोलन केले. या आंदोलनामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दीत रंगत झाल्याने सभा वादळी ठरली.
येथील नगर पालिकेत नगराध्यक्षा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वसाधारण झाली. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, किरण लुणिया, मुझफर शेख, राजेंद्र पवार, भारती कांबळे, राजेश अलग, रवी पाटील उपस्थित होते.
या सभेच्या प्रारंभी पालिकेसमोर विरोधी गटाने केलेल्या श्राद्ध आंदोलनाचा नगराध्यक्षा आदिक यांनी समाचार घेत. स्व. गोविंदराव आदिक यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. तसेच स्व. टेकावडे आणि स्व. जयंतराव ससाणे यांनी अनेक विकासकामे केले. परंतु इतरांनी काय केले, असा सवाल त्यांनी केला.
हेही वाचा - नगरमध्ये पिकतेय गांजाची शेती
शहरात 132 विनापरवाना बांधकाम असून त्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याचा मुद्दा नगरसेवक बिहाणी यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्याधिकारी डोईफोडे यांनी पुढील आठ दिवसांमध्ये शहरातील विनापरवाना बांधकामाची पहाणी करुन आढावा घेणार असल्याचे सांगितले. पालिकेतील बांधकाम विभागातील महत्वाचे दस्तावेज स्कॅनिंग करून ते डिजीटल फाईलमध्ये जतन करण्याची मागणी नगरसेविका हेमा गुलाटी यांनी केली.
गेल्या चार वर्षात प्रभागात विकासकामे झाली नसुन पालिकेकडे निधी नसल्याने लोकसहभागातुन रस्त्याची कामे करण्याची परवानगी देण्याची मागणी नगरसेवक बिहाणी, राजेश अलघ, मुक्तार शहा यांनी केली.
नगरसेवक बाळासाहेब गांगड म्हणाले, असा निर्णय घेवुन पालिकेची बदनामी करू नयेत. पालिकेलाच रस्त्याची कामे करु देण्याचे सांगितले. कोविड काळात कामगिरी केलेल्या व्यक्तींना श्रीरामपूर भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले. तसेच शहरातील पाणी पुरवठा, विविध ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था, सफाई कामगारांचे थक्कीत पगार, कालव्यातील कचरा सफाई, उद्यानातील वाढलेल्या ओल्या पार्ट्या अशा विविध विषयावर सभेत चर्चा झाली.