नगर ः जिल्हा परिषदेतील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन जुन्या इमारतीची डागडुजी करून काही भाग वापरात आणण्याच्या हालचाली करीत आहे. कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले असून, जुन्या इमारतीची डागडुजी झाल्यानंतर बांधकाम विभाग तिकडे हलवावा, अशी मागणी होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुढील काही दिवस तरी कायम राहणार आहे. अशा वेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असताना, जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीत ते शक्य होत नाही. त्यामुळे जुन्या इमारतीची तात्पुरती डागडुजी करून त्यातील काही भाग वापरासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत.
याबाबत "सकाळ'मध्ये "जिल्हा परिषदेची ऐतिहासिक वास्तू येणार वापरात' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले. त्याद्वारे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती मिळाली.
कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या ऐतिहासिक इमारतीची दुरुस्ती व्हावी, अशी अनेकांची अपेक्षा होती, ती पूर्ण होणार असून, ऐतिहासिक वास्तूचे जतन होणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांसह नगरकरांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
अवश्य वाचा ः नागरिकांसाठी पक्ष एकवटले
दरम्यान, बांधकाम विभागात सर्वाधिक गर्दी होते. त्यामुळे येथील सर्व कर्मचारी धास्तावले आहेत. जुनी इमारत वापरात आल्यानंतर हाच विभाग तिकडे हलविला, तर इतर विभागांतील कर्मचारी सुरक्षित राहतील, असे बोलले जाते. त्यामुळे प्रशासनाने या विभागाबाबत निर्णय घ्यावा, अशी चर्चा आहे. याच विभागाबाबत काहींनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह संघटनांकडे तक्रारी केल्या आहेत.
चर्चा करून निर्णय घेणार ः साेळंके
जुनी इमारतीची डागडुजी सुरू असून, गर्दी होणारा कोणता विभाग तेथे न्यायचा, याचा निर्णय दुरुस्ती झाल्यावर अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेण्यात येईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.