esakal | सुरक्षित गुंतवणूकीसाठी ग्राहकांची सोने खरेदीला पसंती! विविध व्हरायटीच्या दागिन्यांना मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

gold

सुरक्षित गुंतवणूकीसाठी ग्राहकांची सोने खरेदीला पसंती!

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : कोरोना विषाणूच्या (Corona virus) संसर्गामुळे गेल्या वर्षभरात शहरासह ग्रामीण भागात शेकडो विवाह सोहळे साधेपणात पार पडले. परिणामी, विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्चाला फाटा देत, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे दागिने खरेदीला ग्राहकांची मोठी पसंती मिळाली आहे. (Consumers-prefer-to-buy-gold-for-safe-investment-ahmednagar-marathi-news)

प्रमुख गुंतवणुकदारांनी सोने खरेदीकडे फिरवली पाठ

बाजारपेठेत सोन्याचा प्रती तोळा ४८ हजार भाव आहे. तर येत्या दिवाळीपर्यंत सोन्याचे दर ६० हजार रुपये प्रती तोळा होण्याची शक्यता व्यापारी वर्गातुन व्यक्त केली जात आहे.

मागील महिनाभरापासून कमी झालेल्या सोन्याच्या दरात अद्याप फारशी वाढ झालेली दिसत नाही. सध्या सोन्याचे भाव उतरले असले, तरी बड्या गुंतवणुकदारांनी सराफ बाजाराकडे पाठ फिरवली आहे. मात्र, कोरोनामुळे विवाह सोहळ्याच्या अनावश्यक खर्चात बचत झाल्याने, सोने- चांदीचे दागिने खरेदीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.

गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या भावात घसरण सुरु आहे. त्यामुळे सतत तेजीत असलेले सोने आता काही अंशी कमी दराने खरेदी करणे शक्य झाले आहे. त्यामुळे प्रारंभी बाजारात सोन्यातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात भाव कमी झाल्यानंतरही प्रमुख गुंतवणुकदारांनी सोने खरेदीला फारसा प्रतिसाद दिला. नसल्याचे समोर आले आहेत.

हेही वाचा: संगणक, लॅपटॉपच्या मागणीत वाढ; किमतीही वधारल्या

विविध व्हरायटीच्या दागिन्यांची क्रेज

मागील वर्षभरात आकर्षक शैलीचे दागिने, नव्याने मार्केट मध्ये आलेले 'चौकर' (जुन्या काळातील ठुशी), 'टेम्पल ज्वेलरी' (देव-देवतांची प्रतिमा असलेली दागिने), 'डायमंड ज्वेलरी' (हिरे आणि मोती जडित दागिने) अशा विविध प्रकारातील सोन्याची दागिने खरेदीचा क्रेज (कल) वाढला आहेत.

-असे वाढले सोन्याचे दर (प्रती तोळा) :

जुलै (२०१९) - ३५ हजार रुपये

जुलै (२०२०) - ४८ हजार रुपये

ऑगस्ट (२०२०) - ५२ हजार रुपये

जुलै (२०२१) - ४८ हजार रुपये

''ग्राहक भाव वाढल्यावर सर्वसाधारणपणे सोन्याची खरेदी करतात. एकदा भाव वाढले की ते आणखी वाढतील या आशेने खरेदीचा कल वाढतो. सोन्याचे दर घसरल्यावर सर्वसामान्य ग्राहक सोने खरेदीला फारसा प्रतिसाद देत नाही. सध्या प्रमुख गुंतवणुकदारांनी दर घसरणीमुळे अपेक्षित सोने खरेदी केलेली नाही. मात्र कोरोना काळात विवाह सोहळे साधेपणाने होत असल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक ग्राहक सोन्या- चांदीचे दागिने खरेदीला पसंती देत आहे.'' - सचिन प्रकाश महाले, संचालक, मे. मे. पोपट भागिरथ महाले ज्वेलर्स, श्रीरामपूर

(Consumers-prefer-to-buy-gold-for-safe-investment-ahmednagar-marathi-news)

हेही वाचा: नाशिक ठरणार चित्रपट-मालिका चित्रीकरणासाठी उत्तम पर्याय

loading image