esakal | सततच्या पावसामुळे पालेभाज्याची आवक मंदावली
sakal

बोलून बातमी शोधा

Continuous rain slowed down the arrival of leafy vegetables

गेल्या महिन्यात तालुक्यात सर्वदुर झालेल्या सततच्या पावसामुळे पालेभाज्यासह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी येथील बाजार समितीच्या भाजापाला बाजारातील पालेभाज्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असुन दरात काही अंशी वाढ झाली आहे.

सततच्या पावसामुळे पालेभाज्याची आवक मंदावली

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : गेल्या महिन्यात तालुक्यात सर्वदुर झालेल्या सततच्या पावसामुळे पालेभाज्यासह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी येथील बाजार समितीच्या भाजापाला बाजारातील पालेभाज्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असुन दरात काही अंशी वाढ झाली आहे.

हेही वाचा : डुबीचं डुबलं, उंचावर सोनं पिकलं; सोयाबीनने दिला शेतकऱ्यांना हात, दिवाळीच्या तोंडावर हातात पैसा
सततच्या पावसामुळे मेथी, पालक, शेपू, कोंथबिरसह विविध पालेभाज्या शेतातच खराब झाल्याने बाजारातील भाजीपाला आवक कमी झाली आहे. गोदावरी नदी पट्यासह प्रवरानदी काठावरील अनेक शिवारात भाजीपालाचे उत्पादन घेतले जाते. येथील बाजार समितीतुन शहरासह नाशिक आणि नगर महानगरात भाजीपाला पाठविला जात होता. परंतू कोरोनाचे संकट आणि सततच्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटल्याने निर्यात ठप्प झाल्याचे स्थानिक व्यापारी सांगतात.

आवक मंदावल्याने मेंथी, शेपू, भोपळा, वांगीचे दर वाढले आहे. पावसामुळे पालक शेतातच खराब झाल्याने पालक बाजारात येत नाही. स्थानिक मिरचीसह जालना येथुन मिरचीची आयात होते. मिरचे दर 30 ते 40 रुपये किलोवर स्थिर आहे. तर वांगी प्रति किलो दहा ते पंधरा रुपयांनी महागले. तर टाॅमेटोचे दर प्रति किलोला दहा रुपयांनी घटले आहे.

बटाटे 25 ते 30 रुपये किलो दर आहे. तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने अनेकांची पिके पाण्याखाली गेल्याचे दिसते. शेतातील सोयाबीन, मका, बाजरी, भुईमुग, कापुस पिकात पाणी साचल्याने पिके पिवळे पडुन खराब झाली. त्यात भाजीपाला उत्पादकांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसते. येथील बाजारात सद्या भाजीपाला कमी प्रमाणात येत असल्याने दरात काही अंशी वाढ झाल्याचे दिसते.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image