
अहिल्यानगर: राज्य सरकारकडून जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेतील महिलांची तपासणी करण्यास अंगणवाडी सेविका संघटनेने नकार दिला आहे. यामुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून हे काम जवळपास ठप्प आहे. आतापर्यंत अवघ्या ४० हजार बहिणींचे अर्ज तपासून झाले आहेत. त्यातच आता जिल्हा परिषदेतील कार्यरत कर्मचारी असलेल्या ११ महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात ही चर्चा सुरू आहे.