बाप रे... आज तर एकदम अठरा...सावेडीतही आला कोरोना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

इतक्या दिवस सावेडी भागा कोरोनापासून मुक्त होता. परंतु तेथेही शिरकाव झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या वाढते आहे.

नगर ः जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले आणखी ०६ नवे रुग्ण वाढले आहेत. नगर शहरातील तिघे तर श्रीगोंदा तालुक्यातील तिघे बाधित झाले आहेत.

नगर शहरातील तोफखाना भागातील ६२ वर्षीय महिला, सिद्धार्थनगर भागातील ३५ वर्षीय पुरुष आणि सावेडी उपनगरातील रासनेनगर येथील ६२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. इतक्या दिवस सावेडी भागा कोरोनापासून मुक्त होता. परंतु तेथेही शिरकाव झाला आहे.

हेही वाचा - आई-बाप म्हणतात, मुलीला साप चावला, डॉक्टरांना वेगळाच संशय

श्रीगोंदा शहरातील १८ वर्षीय युवक आणि ६५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा आहे. तालुक्यातील बेलवंडी येथील ३७ वर्षीय महिलाही बाधित निघाली. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते.

जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह केसेस ४५ झाल्या आहेत तर जिल्ह्यातील बरे होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या आता २४५ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्णसंख्या ३०२ आहे.

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा जोरदार फैलाव होऊ लागला आहे. नागरिकांनी अति दक्षता घेण्याची गरज आहे. आज तब्बल आणखी बारा कोरोनाबाधितांची भर पडली. त्यात संगमनेर सात, पारनेर, नगर शहर प्रत्येकी दोन, अकोले तालुक्‍यातील एका जणाचा समावेश आहे.  

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोल्हेवाडी (संगमनेर) येथील 44 वर्षांचा व 60 वर्षांचा पुरूष, तसेच राजवाडा (संगमनेर शहर) 38 वर्षीय महिला, दिल्ली नाका येथील 42 वर्षांचा पुरुष, नाईकवाडपुरा येथील 65 वर्षांची महिला व 36 वर्षांचा पुरुष, भारत नगर येथील 70 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

जाणून घ्या - मिलिटरीतून सुटीवर आला नि चोरीच करीत सुटला

याशिवाय गोरेगाव (पारनेर) येथील 30 वर्षांचा पुरुष, भोयरे पठार येथील 28 वर्षांचा पुरुषाचा समावेश आहे. या पूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे यांना संसर्ग झाला आहे. नगर शहरातील झेंडीगेट येथील 54 वर्षांचा पुरुषाला, नालेगाव येथील 58 वर्षीय महिला, कोतूळ (अकोले) येथील 48 वर्षांचा पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

कोरोना मीटर (सकाळी आलेल्या अहवालापर्यंत) 
3723 व्यक्तींची तपासणी 
296 पॉझिटिव्ह 
3367 निगेटिव्ह 
274 निरीक्षणाखाली 
1171 होम क्वारंटाईन 
39 अहवाल येणे बाकी 
245 रुग्णांना डिस्चार्ज 
15 जणांचा मृत्यू 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona also came to Savedi