श्रीगोंद्यात नस्ती आफत...बायको पु्ण्यात पॉझिटिव्ह, नवरा आला इकडे मुक्कामाला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती समजली. पतीला ही बाब माहिती असतानाही तो दोन दिवसांपासून श्रीगोंद्यात मुक्कामास आलेला आहे. 
 

श्रीगोंदे  : श्रीगोंदयात कोरोना रुग्ण सापडू नये यासाठी सगळीकडे दक्षता घेतली जात असतानाच आता नसती आफत समोर आली आहे. तालुक्यात आलेल्या एका व्यक्तीची पत्नी पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह असून ती तेथे उपचार घेत आहे आणि हा बहाद्दर नवरा श्रीगोंदयात मुक्कामी आला आहे.

या घटनेने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनीही याला दुजोरा देत सांगितले की, सदर कोरोना पॉझिटिव्ह महिला पुण्यात उपचार घेत आहे. 8 मे रोजी तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती समजली. 

हेही वाचा - साहेब, लवकर या तो प्रेमिकाचा सौदा करतोय

दरम्यान तिच्या पतीला ही बाब माहिती असतानाही तो दोन दिवसांपासून श्रीगोंद्यात मुक्कामास आलेला आहे. त्याला आता तपासणीसाठी नगरला पाठवत असून सगळी काळजी घेतली जात आहे.
दरम्यान, तालुक्याच्या हद्दीवर नाकेबंदी आहेच, शिवाय थर्मल टेस्ट नाक्यावर होत असतानाही हे लोक पुण्यातून श्रीगोंदयात कसे येतात, याविषयी संताप व्यक्त होणार आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात भरलाय अॉनलाईन आखाडा

पारनेर तालुक्यात एक जोडपे मुंबईहून आले होते. त्यांच्यामुळे अवघ्या पारनेरकरांच्या जीवाला घोर लागला होता. कारण त्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी केली जात आहे. आता श्रीगोंद्यातही बायको पॉझिटिव्ह असताना तिचा नवरा मुक्कामाला आला होता. त्यामुळे परिसरातील लोकांचे धाबे दणाणले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona-infected woman's husband resides in Shrigonda