esakal | डॉक्टरांचे पेशंट, वड्याचे ग्राहक आणि जिमचे सदस्यांना 'फुटला घाम'
sakal

बोलून बातमी शोधा

Corona report positive of an 85 year old man from Kukane in Nevasa taluka

तालुक्यातील कुकाणे येथे ८५ वर्षाची व्यक्ती कोरोनाबाधित निघाला.  या व्यक्तीच्या एका मुलाचे कुकाणे बसथांबा परिसरात वडापावचे दुकान तर येथेच दुसरा जिम चालक आहे.

डॉक्टरांचे पेशंट, वड्याचे ग्राहक आणि जिमचे सदस्यांना 'फुटला घाम'

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : तालुक्यातील कुकाणे येथे ८५ वर्षाची व्यक्ती कोरोनाबाधित निघाला.  या व्यक्तीच्या एका मुलाचे कुकाणे बसथांबा परिसरात वडापावचे दुकान तर येथेच दुसरा जिम चालक आहे.

या दोघांसह बाधितावर उपचार करणारे डॉक्टर यांना संशयित म्हणून तालुका प्रशासनाने  त्यांना स्वॅब घेण्यासाठी विलगिकरण कक्षात दाखल केले.  ही बातमी कळाल्याने सर्वात जास्त पाचावर धारण बसली ती बटाटे वड्याचे ग्राहक, जिमचे सदस्य व डॉक्टरांचे पेशंट यांची.  'आपल्याला तर कोरोना झाला नसेल ना'  याविचारानेच त्यांना घाम फुटला असून त्यांनी दुपारपासूनच 'मालेगाव  काढ्या'वर धडाका लावला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कुकाणे येथील कोरोनाबाधित व्यक्तीला गुरुवारी (ता. २३) ताप आल्यावर प्रथम खाजगी डॉक्टरांकडे  तापासणी करण्यात आली.  त्यानंतर संबंधित डॉक्टरने त्यांना कोरोना संशयीत म्हणून नेवासे फाटा येथील विलगिकरण कक्षात पाठवले. तेथे या व्यक्तीचे स्राव घेऊन कुकाणे येथे घरीच होम  क्वारंटाइन केले होते. शनिवारी (ता. २५) त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला.

या दरम्यान बाधित व्यक्तीच्या संपर्कात त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांबरोबरच त्यांची बटाटावडा दुकान चालक व जिम चालक मुलेही आली असतील. त्यामुळे या दोघांसह प्राथमिक उपचार करणारे डॉक्टर यांना प्रशासनाने 'हाय रिक्स' म्हणून विलगिकरण कक्षात दाखल केले खरे.  आता त्यांचा कोरोना अहवाल काय येईल तो येईल मात्र या दोन दिवसात चवीने बटाटावडे मटकावणारे ग्राहक, डॉक्टरांकडे तपासणी, उपचारासाठी दवाखान्यात आलेले ४०-५० रुग्ण तसेच जिममध्ये वर्कआऊटवेळी चालकांशी संपर्कात आलेले ३०-३५ सदस्य यांची अवस्था 'वाऱ्याला वापसतं आणि पाण्याला डाचकतं'या गावरान मराठी म्हणी प्रमाणे झाले आहे. 

संशयीत तिघांचे आहवाल काय येतात या विचाराने ते सर्व अस्वस्थ  आहेत. आता या सर्वांसह त्यांच्या परिवाराचे  संशयीत  तिघांच्या कोरोना आहवालकडे लक्ष लागून आहे. दरम्यान तालुका प्रशासनाने खबरदारी म्हणून कुकाणे येथील वंदेमातरम नगर 'हॉट स्पॉट'जाहीर करून ही गल्ली बंद करण्यात आल्याची माहिती  तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली आहे.  या भागात पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह रुग सापडल्याने  कुकाणे व परिसरात खळबळ उडाली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सूर्यवंशी व कुकाण्याचे आरोग्य  अधिकारी डॉ रामेश्वर शिंदे यांनी तातडीने कुकाणे येथे येऊन बाधित रुग्णाला उपचारासाठी तर त्यांच्या परिवरातील  आकरा व्यक्तींसह उपचार करणारे  डॉक्टर व इतर दोन असे एकूण चौदा जणांना नेवासे फाटा येथील विकगीकरण कक्षात स्राव नमुने घेण्यासाठी दाखल केले.  सायंकाळी तहसीलदार सुराणा यांनी कुकाणे येथे भेट देऊन परिसराची पाहणी केली.
बाधित व्यक्ती ही घरीच होती मात्र त्यांचा जिम चालक मुलगा या आठवड्यात नगर व औरंगाबाद येथे गेल्याचे माहिती आहे. त्यामुळे प वडीलांना बाधा झाली  असण्याची शक्यता  आरोग्य विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली. दरम्यान तहसीलदार रुपेश सुराणा यांनी "या दोन-तीन दिवसांत जिम , संबंधित डॉक्टरांकडे जाणारे सर्वजनांनी या तिघांचा कोरोना अहवाल येईपर्यंत आपापल्या घरीच राहून परिवाराच्या संपर्कात येऊ नये.

हेही वाचा : दूध उत्पादकांना योग्य दर देण्यास महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांचा विरोध

डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी वेळीच उपचार महत्वाचे असल्याने जिम, संबंधित डॉक्टरांकडे गेलेल्यांना  ताप, सर्दी किंवा नरड्यात खवखव होत असेल तर त्यांनी न घाबरत आम्हाला कळवणे असे आवाहन केले.

मालेगाव काढा 'नो  स्टॉक'
दरम्यान जिम व डॉक्टरांचे पेशंट यांनी आज दुपारपासून कुकाणे येथे दुकानातून  मिळेल तेव्हढे मालेगाव काढा'साठी लागणारे  साहित्य  खरेदी केले. दररोजपेक्षा आज या साहित्याला एवढी मागणी वाढली की साहित्य संपल्याने बहुतांशी दुकानदारांनी मालेगाव काढा 'नो  स्टॉक' म्हणून  अनेकांनी सांगितले.  

संपादन : अशोक मुरुमकर

loading image