esakal | अहमदगर जिल्ह्यात कोरोनाच्या 9 रुग्णांचा मृत्यू, 630 नवे बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

corona

अहमदगर जिल्ह्यात कोरोनाच्या 9 रुग्णांचा मृत्यू, 630 नवे बाधित

sakal_logo
By
टीम-ईसकाळ


अहमदनगर :
जिल्ह्यात कोरोनाचे ६३० नवीन रुग्ण वाढले आहेत. बाधितांची एकूण संख्या तीन लाख ४० हजार ८७७ झाली आहे. आरोग्य विभागाच्या पोर्टलवर नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत सहा हजार ७७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या चार हजार ८८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २४१, खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ३९३ आणि अँटीजेन चाचणीत २१४ रुग्ण आढळून आले. दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या ६३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत तीन लाख २९ हजार २१५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५८ टक्के झाले आहे.


तालुकानिहाय नवीन रुग्ण याप्रमाणे - संगमनेर १७५, पारनेर ९०, अकोले ८६, श्रीगोंदे ७७, शेवगाव ६६, पाथर्डी व राहाता प्रत्येकी ६२, नगर तालुका ४०, नेवासे ३८, कोपरगाव ३०, कर्जत २७, राहुरी २४, नगर शहर १९, श्रीरामपूर २२, जामखेड १८, भिंगार छावणी परिषद तीन, बाहेरील जिल्ह्यातील नऊ रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा: कर्जत नगरपंचायतीत भाजपला धक्का, चार नगरसेवक राष्ट्रवादीत

हेही वाचा: जरा थांबा, कांदा हसविणार आहे; शेतकऱ्यांना जाणकारांचे आवाहन

loading image
go to top