esakal | सावधान! नगर दीड हजाराच्या उंबरठ्यावर; जिल्ह्यात आणखी 54 कोरोनाबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

The count of corona positive patients in Nagar district is 1493

जिल्ह्यात शनिवारी आणखी 54 जण कोरोनाबाधित आढळून आले, तसेच 132 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1493वर पोचली आहे. 

सावधान! नगर दीड हजाराच्या उंबरठ्यावर; जिल्ह्यात आणखी 54 कोरोनाबाधित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात शनिवारी आणखी 54 जण कोरोनाबाधित आढळून आले, तसेच 132 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1493वर पोचली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शनिवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार, शहरात 10 रुग्णांची भर पडली. त्यात मार्केट यार्ड तीन, नालेगाव, केडगाव, भिस्तबाग चौक, सुडके मळा, रेल्वे स्टेशन, रंगार गल्ली, बागडपट्टी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. शिवाय श्रीरामपूर शहर दोन, बेलापूर, शिरसगाव येथील प्रत्येकी एक बाधित आढळला. कर्जत शहर, माहिजळगावात प्रत्येकी एक, अकोले शहरात तीन, तसेच लहीत येथे एकाला कोरोनाची बाधा झाली. जामखेड तालुक्‍यातील सोनेगाव, साकत येथे प्रत्येकी एक, तर नगर तालुक्‍यातील निंबळक, घोसपुरी, निमगाव घाणा येथील प्रत्येकी एक जण बाधित आढळला. पाथर्डीत एक, शेवगाव शहर पाच, मुंगी पाच, नेवासे तालुक्‍यातील सोनईत तीन, पारनेर तालुक्‍यातील लोणी मावळा तीन, पिंपळगाव रोठा दोन, कर्जुले हर्या, कुंभारवाडी, वडनेर बुद्रुक, खडकवाडी येथील प्रत्येकी एकाला बाधा झाली. संगमनेर तालुक्‍यातील गुंजाळवाडी तीन, तसेच कुरण येथे तिघे पॉझिटिव्ह आढळले. सध्या 540 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा : कर्जत तालुक्यात ‘या’ दिवसापर्यंत पुन्हा जनता कर्फ्यू
कोरोना मीटर 

10353 व्यक्तींची तपासणी 
1493 पॉझिटिव्ह 
8090 निगेटिव्ह 
612 निरीक्षणाखाली 
789 होम क्वारंटाईन 
524 अहवाल येणे बाकी 
920 रुग्णांना डिस्चार्ज 
35 जणांचा मृत्यू 

महापालिकेचे सहा कर्मचारी कोरोनाबाधित 
महापालिकेत सोमवारी (ता. 13) चार अधिकारी- कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले. त्यांच्या संपर्कातील 17 कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले. त्यांना क्‍वारंटाईनसाठी जागाच नसल्याने, जिल्हा प्रशासनाने त्यांना घरी पाठवून दिले. महापालिका कर्मचाऱ्यांच्या स्वॅबचे अहवाल काल (शुक्रवारी) रात्री प्राप्त झाले. त्यांत सहा कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले. महापालिका कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे जीव महापालिका व जिल्हा आरोग्य विभागामुळे धोक्‍यात आल्याचा आरोप कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी केला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image