esakal | प्रशासनाचा ताण वाढला; नेवासे तालुक्यात कोरोना रुग्णांची हजारी पार
sakal

बोलून बातमी शोधा

Count of corona positive patients in Nevasa taluka is 1027

शहरासह तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सोमवारी ४४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने नेवासा तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजार २७ झाली आहे. तालुका हजारी पार झाल्याने प्रशासनाचा ताण वाढला आहे.

प्रशासनाचा ताण वाढला; नेवासे तालुक्यात कोरोना रुग्णांची हजारी पार

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : शहरासह तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सोमवारी ४४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने नेवासा तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजार २७ झाली आहे. तालुका हजारी पार झाल्याने प्रशासनाचा ताण वाढला आहे.

नेवासे शहरासह ग्रामीण भागातील जनतेने कोरोना महामारीकडे गांभीर्याने पाहावे. आपली, परिवाराची, गावाची काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी केले आहे.

हेही वाचा : घंटागाडीची उंची वाढली; कचरा टाकण्यासाठी महिलांना शोधला ‘असा’ पर्याय
नेवासे कोविड सेंटर येथे सोमवारी ११९ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट घेतल्या. त्यापैकी 31 व्यक्ती तसेच खाजगी प्रयोगशाळेतुन आठ रुग्ण तर जिल्हा रुग्णालयातुन पाच व्यक्तीचे पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. तालुक्यातील ८० जणांच्या घशाचे स्राव नमुने घेण्यात आले आहेत.

तालुक्यातील नेवासे शहर, सौंदळे, शिरसगाव, कुकाणे, मक्तापुर, भानसहिवरे, मुकिंद पूर, घोडेगाव, सोनई, शनी शिंगणापूर, लांडेवाडी, भेंडे बुद्रुक खडका, रांजणगाव देवी येथील रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता तालुक्यातील रुग्ण संख्या १००० झाली आहे. त्यापैकी २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७०३ रुग्णांची बरे होऊन घर वापसी झाली आहे. हल्ली २९९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहीती तालुका प्रशासनाने दिली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जनतेला गांभिर्याच नाही

नेवासे तालुक्यात रोजची वाढणारी रुग्णसंख्या पाहता खबरदारी म्हणून नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. सोशल डिस्टसिंग पाळावे, गर्दीचे कार्यक्रम टाळावे. असे आवाहन तालुका प्रशासन व आरोग्य विभाग करत असला तरीही  जनता प्रशासनाच्या आवाहनाकडे गांभिर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तालुक्यात रुग्ण वाढतच आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर