आज आहे गावपुढाऱ्यांची परीक्षा, दुपारपर्यंतच लागेल निक्काल

Counting of votes for Gram Panchayat elections today
Counting of votes for Gram Panchayat elections today

नगर ः जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान झाले होते. या ग्रामपंचायतींची मतमोजणी उद्या (सोमवारी) नऊ वाजता संबंधित तहसील कार्यालय परिसरात होणार आहे. त्यासाठी 602 अधिकारी-कर्मचारी नियुक्‍त केल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांनी दिली. 

जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतींची मतमोजणी संबंधित तहसील कार्यालयाने ठरवून दिलेल्या ठिकाणी होणार आहे. सकाळी नऊ वाजता मतमोजणीस सुरवात होईल. जिल्ह्यात 13 हजार 194 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

नगर तालुक्‍याची मतमोजणी प्रक्रिया वसंत टेकडी परिसरातील डॉ. ना. ज. पाऊलबुधे विद्यालयात होईल. त्यासाठीची सर्व तयारी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आहे. 
प्रत्येक तहसील कार्यालयात मतमोजणीसाठी 14 टेबल लावले आहेत. त्यात प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात असे 588 कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्‍त केले आहेत. शिवाय प्रत्येक तालुक्‍यात एक निवडणूक निर्णय अधिकारी असेल. मतमोजणी प्रक्रिया शांततेत होण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. संवेदनशील गावांवरही पोलिसांची करडी नजर असेल. दुपारपर्यंत निवडणुकीचे सर्व निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे. 

मोबाईल ठेवा घरीच 
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान, तसेच मतमोजणी परिसरात मोबाईल नेण्यास सक्‍त मनाई आहे. कोणाकडे मोबाईल आढळल्यास ते जप्त केले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी मतमोजणी परिसरात येताना मोबाईल घरीच ठेवावेत, असे आवाहन तहसीलदार उमेश पाटील यांनी केले आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com