esakal | शनैश्वर देवस्थानचे कोवीड रुग्णालय सुरु

बोलून बातमी शोधा

Covid hospital of shaneshwar devasthan

शनिमंदीर दर्शनासाठी बंद असल्याने देवस्थानचे सर्व विभागातील कर्मचारी कोरोना रुग्णांच्या सेवेत दिवस रात्र कार्यरत आहेत.

शनैश्वर देवस्थानचे कोवीड रुग्णालय सुरु
sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सुचनेनंतर शनैश्वर देवस्थानच्या ग्रामीण रुग्णालयात प्रशासनाच्या देखरेखीखाली कोवीड रुग्णांसाठी उपचार सुरु झाले आहे. पहिल्या दोन दिवसात येथे २८ रुग्ण दाखल झाले आहेत.

हेही वाचा: तिसगाव गटाने सामाजिक बांधिलकी जपली : कर्डिले

तालुक्यात वाढलेली कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून मंत्री गडाख यांनी चार दिवसापूर्वी रुग्णालयास भेट देवून सुचना दिल्यानंतर रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दोन दिवसात २८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहे. तर कोवीड सेंटरच्या विलगीकरण कक्षात ८५ रुग्ण उपचार घेत आहेत. शनिमंदीर दर्शनासाठी बंद असल्याने देवस्थानचे सर्व विभागातील कर्मचारी कोरोना रुग्णांच्या सेवेत दिवस रात्र कार्यरत आहेत. सर्व रुग्णांना देवस्थानच्या वतीने चहा, पाणी, नाश्ता व जेवणाची व्यवस्था दिली जात आहे.

हेही वाचा: राळेगणसिद्धीत 50 बेडचे कोविड सेंटर सुरू

रुग्णालयात डॉ. शिवराम गुंजाळ, डॉ.गणेश खटके, डॉ. प्रकाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली 10 डॉक्टर व 100 हून अधिक रुग्णसेवक, सेविका व सफाई कामगार सेवा देत आहेत.

हेही वाचा: कोठारी कुटुंबाकडून एक लाख 11 हजारांची मदत

कोवीडसाठी नव्यानेच रुग्णालय सुरु केल्याने उपलब्ध सोयीनुसार सुविधा दिल्या जात आहे. सध्या 11 रुग्णांना ऑक्सिजन सुविधा सुरु आहे. सध्या कोवीड १९ करीता आरोग्य विभागाने तीनसुत्री योजना ठरविली असल्याने ९० च्या आतील ऑक्सिजन लेव्हल असलेल्या रुग्णास जिल्हा रुग्णालयात हलवले जाते. ९० आणि त्यापुढील ऑक्सिजन असलेल्या रुग्णास येथे उपचार केले जातात.

- डॉ. अभिराज सुर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी

गोरगरिबांसाठी येथील रुग्णालय तारणहार आहे. येथे रुग्णांची घरच्या सारखी सोय ठेवली जाते. देवस्थान देत असलेली सुविधा व घेत असलेली काळजी कौतुकास्पद आहे.

- राजेंद्र शिंदे, नातेवाईक, जळके खुर्द

येथे अधिक चांगली आरोग्यसेवा देण्याचाच प्रयत्न सुरु आहे. प्रशासनाच्या देखरेखीखाली चांगले काम सुरु झाले असताना काही व्यक्ती जाणीवपूर्वक राजकारण आणून दिशाभूल करत आहे.

- भागवत बानकर, अध्यक्ष शनैश्वर देवस्थान