भाजपचे राजकारण त्यांनाच लखलाभ, दादा भुसे यांची टीका

Dada Bhuse criticise of BJPs politics
Dada Bhuse criticise of BJPs politics

नगर : सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले असून, त्यावर ठोस औषध उपलब्ध नाही. अशा वेळी राजकारण करणे योग्य नाही. जे करीत असतील, त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ! राजभवन सर्वांसाठीच खुले आहे. सामान्य नागरिकही राज्यपालांना भेटू शकतो. त्यामुळे ज्यांना राज्यपालांना भेटायचे आहे, त्यांनी खुशाल भेटावे, अशा शब्दांत कृषिमंत्री दादा भुसे यांनी भाजपवर टीका केली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, आमदार नीलेश लंके, आशुतोष काळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आदी उपस्थित होते. 

गटशेती करणाऱ्यांना आर्थिक मदत

मंत्री भुसे म्हणाले, ""खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते, बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील. मागणी केल्यास, कृषी विभागाच्या समन्वयाने शेतकऱ्यांना बांधावर खते-बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारने बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेची घोषणा केली. शेतकरी आर्थिकदृष्टया संपन्न व्हावा, यासाठी योजनेंतर्गत प्रामुख्याने गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल.'' 

काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई

खरीप हंगाम आला, की खते-बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट सुरू होते. परंतु, आता याद राखा, चढ्या भावाने विक्री केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. शेतकऱ्यांची फसवणूक अजिबात खपवून घेणार नाही. असे गैरप्रकार आढळल्यास नुसती कारवाई नाही, तर कठोर शिक्षा केली जाईल. हे बोलून नव्हे, तर कृतीतून दाखवून देऊ, असा खणखणीत इशारा कृषिमंत्री भुसे यांनी दिला. 

टोळधाडीचा उगम पाकिस्तानात

पाकिस्तानाच्या वाळवंटात टोळधाडीचे उगमस्थान आहे. तेथून मध्य प्रदेश व सातपुडा ओलांडून राज्यातील अमरावती जिल्ह्यात ही टोळधाड उतरली. टोळधाड आल्याचे कळताच, तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. औषधफवारणी करून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश यंत्रणेला दिले असल्याचे भुसे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com