esakal | आई-बापाच्या मेहनतीचे पोरीने केले चीज! गरिबीचे चटके ते आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी
sakal

बोलून बातमी शोधा

success story

आई-बापाच्या मेहनतीचे केले चीज! मोठ्या कंपनीत मिळविली नोकरी

sakal_logo
By
संजय काटे

श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : मूळचं गाव दुष्काळी. त्यामुळे काम मिळविण्यासाठी वडिलांनी अगोदरच स्थलांतर केले. त्यांनी घर चालविण्यासाठी सायकल पंक्चर काढण्याचे दुकान टाकले. आई लोकांच्या शेतात मजुरी करायची. गरिबीचे चटके ‘ती’ लहानपणापासून अनुभवत होती. सुटीच्या दिवशी आईसोबत मजुरीचे काम करणाऱ्या वांगदरी गावातील प्रिया छोटूराम जाधव हिने परिस्थितीची जाण ठेवली. विद्वत्तेच्या जोरावर यंत्र अभियांत्रिकी पदविका परीक्षेच्या निकालाआधीच पुण्यातील खासगी आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीला लागली अन आई-वडिलांच्या श्रमाचे चीज झाले. (daughter-became-engineer-Got-job-in-big-company-marathi-news)

आई-बापाच्या मेहनतीचे पोरीने केले चीज

चाळीस वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे कर्जात (ता. शहादा) गावचे जाधव कुटुंब हाताला काम मिळावे म्हणून वांगदरीला, मामाच्या गावी आले. तेथेच मोलमजुरी करीत स्थिरावल्यावर, दहा वर्षांनी वांगदरीतील चौकात सायकल पंक्चरचे दुकान सुरू केले. छोटूराम जाधव यांना प्रिया व शिवतेज ही दोन मुले. प्रियाचे प्राथमिक शिक्षण वांगदरीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले व दहावीपर्यंतचे शिक्षण तिने शिवाजीराव नारायणराव नागवडे विद्यालयात घेतले. बारावीला ८० टक्के गुण मिळाले; मात्र आर्थिक अडचणींमुळे पदवीऐवजी पदविकेला प्राधान्य देत

सायकल पंक्चर काढणाऱ्याची मुलगी झाली इंजिनिअर; मोठ्या कंपनीत मिळाली नोकरी

सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये २०१९मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला. सध्या पदविकेच्या अंतिम वर्षात असताना निकालाआधीच, पुणे येथील ऑटोमोटिव्ह क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मॅग्ना ऑटोमोटिव्ह या आंतरराष्ट्रीय कंपनीत ज्युनिअर इंजिनिअर या पदावर तिला नियुक्ती मिळाली आहे. ऑनलाइन मुलाखतीद्वारे तिची निवड करण्यात आली आहे. निवड झाल्याचे समजताच जाधव वस्तीवर आनंदोत्सव झाला.

हेही वाचा: देवदैठणचे प्रकरण वेगळ्या वळणावर; 'ती' घटना खून नव्हे, अपघात?

हेही वाचा: राज्यात नगरचा ‘क्राइम रेट’ सर्वाधिक : पोलिस अधीक्षक पाटील

loading image