esakal | देवदैठणचे प्रकरण वेगळ्या वळणावर; 'ती' घटना खून नव्हे, अपघात?
sakal

बोलून बातमी शोधा

nagar crime

देवदैठणचे प्रकरण वेगळ्या वळणावर; 'ती' घटना खून नव्हे, अपघात?

sakal_logo
By
संजय काटे

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : पिंपळनेर (ता. पारनेर) येथील पांडुरंग पवार यांच्या खूनप्रकरणी तिघांना बेलवंडी पोलिसांनी अटक केली. चौथा आरोपी म्हणून मृताच्या सख्या भावाचाही समावेश आहे. अगोदर हा खून गोळीबारातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला; मात्र शवविच्छेदनानंतर, तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याचे सांगण्यात आले. आता तर तो खून असण्याची शक्यता कमीच असून, अपघात असू शकतो, या तर्कावर पोलिस आल्याने, या घटनेतील गोंधळ वाढला आहे. दरम्यान, अटकेतील तिन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढविल्याची माहिती पोलिसांनी दिली. (incident-in-Devdaithan-is-murder-or-accident-marathi-news-jpd93)

पोलिसांचा तपास वेगळ्या वळणावर

पवार यांचा मृतदेह ११ जुलै रोजी बेलवंडी-शिरूर रस्त्यालगत देवदैठण शिवारात आढळून आला. मृताचा मुलगा सागर पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून शंकर जयवंत पवार, दत्तात्रेय भाऊसाहेब लटांगळे, शिवदास श्रीरंग रासकर व काशिनाथ जेक्टे या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटकही करण्यात आली. अटकेतल आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती; मात्र या चार दिवसांत आरोपींकडून खुनाबाबत माहिती मिळाली नसल्याचे समजले. दरम्यान, पांडुरंग पवार हे ते जात असलेल्या वाहनातून खाली पडले. डोक्याला जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घाबरल्याने आपण पळून गेलो, असे आरोपी सांगत आहेत. त्यांच्या जबाबामुळे पोलिसही चक्रावले आहेत. त्यामुळे हा खून की अपघात, याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिस विविध शक्यता तपासून पाहत आहेत. त्यामुळे पोलिसांना आता सूक्ष्म तपास करून त्यावेळी नेमके काय घडले हे उलगडून दाखवावे लागेल.

आरोपींना पोलिस कोठडी

या घटनेतील फिर्याद खुनाची आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, आरोपींकडून मिळणारी माहिती अपघाताची आहे. ‘आमच्या पद्धती’ने तपास केला तरीही, तो खून नसून अपघातच आहे, यावर आरोपी ठाम आहेत. त्यामुळे आम्ही सगळ्या बाजूंनी तपास करीत आहोत. - अण्णासाहेब जाधव, पोलिस उपअधीक्षक, कर्जत

हेही वाचा: लग्नाआधीच भंगली सुखस्वप्ने; भावी नवरीने संपविली जीवनयात्रा

हेही वाचा: एक दिवस येता, पंधरा दिवस फोटो फिरवता; रोहित पवारांवर टीका

loading image