esakal | देशी कोंबडीपालन अडचणीत- खाद्याचे दर वाढल्याने घटली मागणी; शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Decreased demand of indegenous chicken

देशी कोंबडीपालन अडचणीत- खाद्याचे दर वाढल्याने घटली मागणी

sakal_logo
By
सूर्यकांत नेटके

अहमदनगर : तीन महिन्यांपासून खाद्याचे वाढते दर, तसेच सलग सण- उत्सवांमुळे देशी कोंबडीच्या मांसाची मागणी कमी झाली. उत्पादन खर्च पन्नास रुपयांनी वाढला आहे. मागणी नसल्याने पिलांचे दरही खाली आले आहेत. शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे.

महाराष्ट्रातून अनेक राज्यात देशी कोंबड्यांचा पुरवठा

राज्यात ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगासोबत स्थानिक, तसेच विकसित केलेल्या विविध देशी (गावरान) कोंबडीपालनालाही शेतकरी प्राधान्य देतात. राज्यात सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक शेतकरी शेडमध्ये देशी (गावरान) कोंबड्यांचे पालन करतात. त्यातून दर महिन्याला ६० लाखांपेक्षा अधिक देशी कोंबड्याचे, तर दर दिवसाला राज्यात १० लाखांपेक्षा अधिक तसेच नगर जिल्ह्यात दर दिवसाला ८० हजारांपेक्षा अधिक अंड्यांचे उत्पादन होते. नगरसह सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, धुळे, जळगाव, धुळे, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, लातूर, सोलापूर जिल्ह्यांत देशी कोंबडीपालन अधिक होते. महाराष्ट्रातून गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यात देशी कोंबड्यांचा पुरवठा होतो.

हेही वाचा: नाशिकमध्ये शंभर टक्के लसीकरणासाठी ‘कवच-कुंडल’ मोहीम

ब्रॉयलर कोंबडीची ४५ ते ५० दिवसांत वाढ होते. देशी कोंबडीला मात्र ७५ ते ८० दिवसांचा कालावधी लागतो. तीन महिन्यांपूर्वी खाद्यासाठी लागणाऱ्या सोया-डीओटीचे दर ३८ रुपये किलो होते, आता ते ६८ ते ७० रुपये आहेत. मध्यंतरी हा दर १०७ रुपयांपर्यंत गेला होता. मकाही दोन हजारांच्या पुढे गेलीय. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झालीय. पूर्वी ११० रुपयांपर्यंत असणारा उत्पादन खर्च आता १४५ रुपयांवर गेलाय. गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांकडून खरेदी करतानाचा दर मात्र प्रतिकिलो १०५ ते ११० रुपयांवर स्थिर आहे. मागणी नसल्याने पूर्वी २२ ते २४ रुपयांना विकले जाणारे पिलू आता १० ते १२ रुपयांवर आले आहे.

हेही वाचा: बाजार समित्यांच्या निवडणुकांचा रंगणार फड! कार्यक्रम जाहीर

''ग्रामीण आणि शहरी भागांतही अलीकडच्या काळात देशी (गावरान) चिकनला प्राधान्य दिले जात आहे. मागणीही चांगली असते. कोरोना संकटात सर्वाधिक गावरान कोंबडी आणि अंड्यांना मागणी होती. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून पशुखाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढल्याचा आर्थिक ताण शेतकऱ्यांवर येत आहे. श्रावणमास, गणेशोत्सव व आता नवरात्र यांचाही मागणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दर मात्र कमी आहेत.'' - संतोष अंकुश कानडे, अध्यक्ष, नगर जिल्हा पोल्ट्री असोसिएशन

loading image
go to top