esakal | संतभूमी देवदैठणमध्ये चक्क अघोरी प्रकार! भाविकांमध्ये घबराटीचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

superstition

संतभूमी देवदैठणमध्ये अघोरी प्रकार! झाडाला टांगल्या बाहुल्या

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

देवदैठण (जि.अहमदनगर) : श्रीगोंदे तालुक्यातील अघोरी जादूटोण्याचा प्रयत्न करण्यात आला. संत निंबराज महाराजांची भूमी असलेल्या देवदैठण गावातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. कोरोनाचे नियम पाळून अनेक कार्यक्रम साजरे होत आहेत. परिसरातून या ठिकाणी दर्शनासाठी अनेक भाविक पहाटेपासून येतात. पहाटेच्या आरतीसाठी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असते.

देवदैठणमध्ये जादूटोणा; झाडाला टांगल्या बाहुल्या

बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे देवीआईचे सर्व पूजापाठ उरकल्यावर माळावर फिरत असताना, उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष महाराज कौठाळे यांना रस्त्याच्या कडेला झाडांना काळ्या फडक्यामध्ये मोठमोठ्या वस्तू बांधलेल्या आढळल्या. अंधश्रद्धेपोटी हा अघोरी प्रकार केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ गावातील सतर्क तरुण अशोक कौठाळे, श्रीकांत कौठाळे, रामभाऊ कौठाळे, नवनाथ कौठाळे, महेश कौठाळे यांच्या मदतीने झाडाला बांधलेल्या काळ्या कपड्यातील वस्तू तत्काळ काढल्या. त्यामध्ये नारळ, राख, लिंबू, काळ्या बाहुल्या, टाचण्या, कवडी, हळद-कुंकू व अन्य वस्तू आढळल्या. अज्ञात व्यक्तीने केलेला हा खोडसाळपणा आहे. असा प्रकार घडल्यास संबंधितांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संतोष महाराज कौठाळे यांनी सांगितले.

हेही वाचा: उदयनराजे भोसलेंच्या ताफ्यात अलिशान कार! किंमत वाचून व्हाल थक्क

अशा अघोरी कृत्यांना थारा देऊ नये

देवदैठण गावाला मोठी संतपरंपरा लाभली आहे. श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा असू नये. आपले दुकान चालविण्यासाठी सुरू असलेल्या अशा अघोरी प्रकारांना सामान्य माणसे बळी पडतात. रूढी-परंपरा जपाव्यात, पण अशा अघोरी कृत्यांना थारा देऊ नये. - लक्ष्मीकांत दंडवते, अध्यक्ष निंबराज महाराज देवस्थान

हेही वाचा: तेव्हा भाजप नेत्यांनी माझ्या जावयाला 'ड्रगडीलर' ठरवलं - मलिक

loading image
go to top