पंतप्रधानांच्या संबोधनातून देशातील जनतेचा अपेक्षाभंग ः थोरात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात उदो उदो केलेल्या पंतप्रधानांच्या राष्ट्रसंबोधनामुळे भारतीय जनतेचा भ्रमनिरास झाला. गरीब, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्ग व लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्यांसाठी भरीव मदत, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची घोषणा व सीमेवर आगळीक करणाऱ्या चीनला लाल डोळे दाखवतील, अशी अपेक्षा होती; मात्र पंतप्रधानांच्या संबोधनातून देशातील जनतेचा अपेक्षाभंग झाला,'' अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केली. 

संगमनेर ः ""भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात उदो उदो केलेल्या पंतप्रधानांच्या राष्ट्रसंबोधनामुळे भारतीय जनतेचा भ्रमनिरास झाला. गरीब, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्ग व लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्यांसाठी भरीव मदत, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची घोषणा व सीमेवर आगळीक करणाऱ्या चीनला लाल डोळे दाखवतील, अशी अपेक्षा होती; मात्र पंतप्रधानांच्या संबोधनातून देशातील जनतेचा अपेक्षाभंग झाला,'' अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केली. 

हेही वाचा रेकॉड ब्रेक : नगर जिल्ह्यात दिवसभरात 43 कोरोना रुग्ण 

थोरात यांनी याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कोरोना प्रादुर्भावाच्या सुरवातीलाच गरीब वर्गाकरिता प्रतिमहिना पाच किलो अन्नधान्य मोफत देण्याची योजना लागू करण्यात आली होती. देशात अन्नधान्याचा मोठा साठा उपलब्ध असल्याने, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ही योजना सप्टेंबरपर्यंत वाढवावी, अशी मागणी केली होती. अगोदरच्याच योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय हा प्रशासकीय असल्याने, राष्ट्रसंबोधनाची आवश्‍यकता नव्हती; पण कदाचित बिहारच्या निवडणुका पंतप्रधानांकरिता महत्त्वाच्या असल्याने, या योजनेला दिलेली मुदतवाढ त्यांनी स्वत: जाहीर केली असावी. मात्र, गरजूंच्या अन्नधान्याव्यतिरिक्त इतरही गरजांबद्दल पंतप्रधानांनी अवाक्षरही काढले नाही. आवश्‍य वाचा

हेही वाचा फेरफार नडली : मंडलाधिकारी आव्हाड व तलाठी कैदके निलंबित 

पाच किलो गहू किंवा तांदूळ व एक किलो हरभरा ही मदत अत्यंत तुटपुंजी असून, रोजगार गेलेल्या गरिबांचे कुटुंब महिनाभर यावर चालणार नाही. गरिबाचे घर चालवण्यासाठी त्यांना रोख मदत देण्याची आवश्‍यकता आहे. खासदार राहुल गांधी यांनी मागणी केल्याप्रमाणे केंद्र सरकारने गरिबांच्या खात्यात प्रतिमहिना साडेसात हजार रुपयांची मदत थेट द्यावी. नोव्हेंबरपर्यंत कोरोनाचे संकट राहणार आहे, अशी अप्रत्यक्ष कबुलीच पंतप्रधानांनी आज दिली आहे. त्यामुळे गरिबांसह मध्यमवर्ग, नोकरपेशा व बेरोजगारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. 

हेही वाचा क्‍या बात है होमिओपॅथी कोरोनावर ठरतेय असरदार, नगरच्या डॉक्‍टरांचे हे आहेत निष्कर्ष 

कोरोनासंदर्भात देश समाधानकारक कामगिरी करीत आहे, असे आश्‍चर्यकारक विधान पंतप्रधानांनी केले. कोरोनाच्या रुग्णसंख्येत जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या देशाच्या पंतप्रधानांकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची कोणतीही ठोस उपाययोजना नाही, हे आज पुन्हा स्पष्ट झाले आहे. चीनच्या संदर्भात पंतप्रधान ठोस भूमिका घेतील, ही देशवासीयांची अपेक्षादेखील फोल ठरल्याचे थोरात यांनी पत्रकात म्हटले आहे.  
अहमदनगर 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disappointment of the people of the country through the Prime Minister's address: Thorat