esakal | प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न दिल्याने पाथर्डीत नाराजी; समर्थक देणार पदांचा राजीनामा?
sakal

बोलून बातमी शोधा

Pritam-Munde

प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न दिल्याने पाथर्डीत नाराजी

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

पाथर्डी (जि. नाशिक) : केंद्रात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मंत्रिपद मुंडे यांच्यासाठी महत्त्वाचे नव्हते, तर जनतेसाठी महत्त्वाचे होते. भारतीय जनता पक्षाचा तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे देणार असल्याची माहिती माणिक खेडकर यांनी दिली. (displeasure-in-Pathardi-on-not-giving-ministerial-post-to-Pritam-Munde-ahmednagar-political-news)

पंकजा मुंडे यांना एकाकी पाडण्याचा डाव आहे काय?

‘सकाळ’शी बोलताना खेडकर म्हणाले, ‘‘केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव शपथविधीपर्यंत आघाडीवर होते. ऐन वेळी असे काय झाले, की मुंडे यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. विधान परिषदेवरही पंकजा मुंडे यांना घेण्याचे ठरले आणि ऐन वेळी वंजारी समाजातील अन्य व्यक्तीला आमदार केले गेले. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे मंत्री म्हणून आम्ही स्वागत करतो. मात्र, प्रीतम मुंडे यांनाही मंत्रिपदाची संधी मिळायला हवी होती. पंकजा मुंडे यांना एकाकी पाडण्याचा डाव पक्षाचे नेतृत्व खेळत आहे का, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.’’

हेही वाचा: 'नेता राहुल गांधी जैसा हो! ही घोषणा बैलांनाही आवडली नाहीये' - फडणवीस

पाथर्डीचे सर्वच पदाधिकारी देणार राजीनामे!

‘‘भारतीय जनता पक्ष वाढविण्यातील (स्व.) गोपीनाथ मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे योगदान पक्षाचे राज्यातील नेतृत्व कसे विसरले? आम्ही भारतीय जनता पक्षाचे पाथर्डीचे सर्वच पदाधिकारी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे पदांचे राजीनामे देणार आहोत,’’ असे ते म्हणाले. मुंडे यांना मंत्रिपद टाळल्यामुळे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. पाथर्डीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष मुंडे स्वीकारणार की नाकारणार, यानंतरच खरे काय ते समजेल.

(displeasure-in-Pathardi-on-not-giving-ministerial-post-to-Pritam-Munde-ahmednagar-political-news)

हेही वाचा: 'सहकार क्षेत्र बुडविणाऱ्यांना नव्या खात्यासंदर्भात भीती'

loading image