

Shirdi Crime
sakal
शिर्डी: इन्स्टाग्रामवरील मुलींच्या मैत्रीतून झालेल्या वादात बुधावारी (ता.१७) येथील एका १७ वर्ष मुलावर तिघांनी चाकूहल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी पाचच्या सुमारास शहरातील अग्निशमन केंद्राजवळ हा प्रकार घडला. या हल्ल्यातील दोन आरोपींची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले.