

Remembering Dr. Kumar Saptarshi: A Son of Rashin Who Inspired Generations
sakal
-दत्ता उकीरडे
राशीनमध्ये लोकशाहीची मूल्ये रुजवण्यासाठी, युवक क्रांती दलाच्या माध्यमातून सामाजिक न्यायासाठी तत्कालीन मालकशाहीच्या विरोधात लढा उभारणारे युक्रांदचे संस्थापक माजी आमदार ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आज आपल्या सर्वांचा अखेरचा निरोप घेतला. त्यांनी उभारलेला सामाजिक परिवर्तनाचा लढा राशीनकरांच्या स्मरणात राहील.