

Dr. Sujay Vikhe
Sakal
शिर्डी: पंतप्रधान आवास योजनेतून स्वमालकीचे घरकुल आणि अन्य पायाभूत सुविधांसह साडेतीनशे विस्थापित कुटुंबांचे पुनर्वसन करणारा राज्यातील पहिला प्रकल्प शिर्डीत लवकरच आकारास येईल. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून उभारल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पाच्या जागेचे पट्टेवाटप पंचवीस मार्चपर्यंत विस्थापितांना केले जाईल, अशी माहिती माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली, तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिलपासून शिर्डीतील वाहतूक व्यवस्थेत आमुलाग्र बदल होतील. एकही वाहन रस्त्यावर उभे दिसणार नाही. दहा लाख भाविक आले, तरी वाहतुकीची कोंडी होणार नाही, असेही विखे यांनी सांगितले.