
अहिल्यानगर : आमदार संग्राम जगताप ही एक व्यक्ती नाही, तो एक विचार आहे. याच विचाराने आज प्रत्येकजण हिंदुत्वासाठी काम करत आहे. जो हिंदूंसाठी काम करेल तोच देशावर राज्य करेल, अशी भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे. प्रत्येक संकटात पाठीशी उभा राहणाऱ्या मित्राला जाहीर समर्थन देण्यासाठी मी आलो आहे. अशीच एकजूट कायम ठेवून हिंदूंची ताकद आमदार जगताप यांच्या मागे उभी करा, असे आवाहन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.