esakal | नाऊर वैजापूर रस्त्यावर खड्डे चुकवण्यासाठी चालकांची कसरत
sakal

बोलून बातमी शोधा

Driver exercise to avoid potholes on Naur Vaijapur road

नाऊर मार्गे वैजापूर रस्त्यावर पडलेल्या शेकडो खड्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदी पट्यातील नागरीकांचा खड्डेमय रस्त्यावरुन धोकादायक प्रवास सुरु आहे. गेल्या अनेक वर्षापासुन रस्ता दुरुस्तीचे काम रखडले आहे.

नाऊर वैजापूर रस्त्यावर खड्डे चुकवण्यासाठी चालकांची कसरत

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील नाऊर मार्गे वैजापूर रस्त्यावर पडलेल्या शेकडो खड्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदी पट्यातील नागरीकांचा खड्डेमय रस्त्यावरुन धोकादायक प्रवास सुरु आहे. गेल्या अनेक वर्षापासुन रस्ता दुरुस्तीचे काम रखडले आहे. निमगावखैरी ते नायगाव फाट्यापर्यंत सहा किलोमिटर रस्ता दुरुस्तीचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेतुन माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रयत्नातुन झाले होते. परंतू उर्वरित नायगाव फाट्यापासुन नाऊर परिसरासह वैजापूर हद्दीतील रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासुन दुरुस्तीची कामे रखडले आहे.

रस्त्यावर पडलेल्या शेकडो खड्ड्यामुळे वाहनाचे नुकसान होत आहे. वैजापूर आणि श्रीरामपूर दोन तालुक्यांना जोडण्यासाठी हा प्रमुख रस्ता असल्याने नेहमी वर्दळ असते. गोदावरी नदी परिसरातील शेतकर्यांसह वैजापूर तालुक्यातील शेतमाल श्रीरामपूर बाजारात विक्रीसाठी येतो. चांगला रस्ता नसल्याने शेतकर्यांची मोठी गैरसोय होते. खड्ड्यामुळे रस्त्याची चाळण झाली असुन दोन फुटापेक्षा मोठे खड्डे रस्त्यावर पडले आहे. वाहन खड्ड्यात गेल्याने मोठे नुकसान होते. मालवाहतुकीसाठी अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. खड्डेमय रस्त्यावरुन प्रवास केल्याने अनेकांना मणके दुखीची समस्या भेडसावत आहे. 

चांगला रस्ता नसल्याने श्रीरामपूर-वैजापूर एसटी बसेस सुविधा ठप्प आहे. रस्त्यावर खड्डे असल्याने श्रीरामपूर आगाराने वैजापूरसाठी जाणारी एसटी गेल्या अनेक वर्षापासुन बंद केली आहे. प्रवाशांच्या सोईसाठी नाईलाजाने वैजापूर आगाराने श्रीरामपूरसाठी दोन एसटी बसेस सुरु ठेवल्या आहे. त्याच एसटी बस दिवसभर फेरया मारतात. त्यामुळे प्रवाशांना अनेकदा वेळेवर एसटीबस मिळत नाही. खड्ड्यामुळे वाहनाचे नुकसान होत असल्याने खासगी वाहतुक होत नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

जाफराबादचे सरपंच संदीप शेलार म्हणाले, अनेक वर्षापासुन श्रीरामपूरहुन वैजापूरला जाण्यासाठी चांगला रस्ता झालेला नाही. खड्डेमय रस्त्यामुळे प्रवाशांची नेहमी गैरसोय होते. लोकप्रतिनिधीसह सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीसाठी लक्ष देण्याची गरज आहे. परिसरात योगिराज गंगागिरी महाराज, सदगुरु नारायणगिरी महाराज आणि स्वामी सहजानंद भारती यांचे समाधीस्थळ असुन रस्ता नसल्याने लाखो भाविक दर्शनासाठी येणास टाळतात. यापुर्वी निमगावखैरी ते नायगाव फाटा सहा किलोमिटर रस्त्याची दुरुस्ती झाली. परंतू नाऊर परिसरासह वैजापूर हद्दीतील उर्वरित रस्ता दुरुस्तीचे काम रखडले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर