दादा पाटील महाविद्यालयात अडीच टनांचा गांडूळ खत प्रकल्प

Dada patil college
Dada patil college

कर्जत : येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाने उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रमाबरोबरच एकूण ७५० चौरस फूट आकाराच्या जागेत ७ बेड तयार केले आहेत. त्यातून गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. महिन्याकाठी २.५ ते ३ टन गांडूळ खताची सध्या निर्मिती केली जात आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांचे हस्ते पार पडले. या उद्घाटन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, नितीन धांडे, सुनील शेलार, प्रा. विशाल मेहेत्रे, रज्जाक झारेकरी, डॉ. शबनम इनामदार, मनीषा सोनमाळी, दीपक यादव आदी उपस्थित होते. पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या या महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा उत्तम आहे. कर्जतसारख्या दुष्काळी भागात असूनही या कॉलेजने शिक्षणाच्या बाबतीत नावलौकिक कमावला आहे. या महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेली रयत मिलिटरीही देशभरात कौतुकास्पद कामगिरी करीत आहे. एनसीसीमुळे सैन्य दलात भरती होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे.

(Earthworm Fertilizer Project at Dada Patil College)

Dada patil college
भाजप सरकारने मला नि कुटुंबालाही छळलं, मंत्र्यांचा गौप्यस्फोट

या वेळी बोलताना ते म्हणाले, दादा पाटील महाविद्यालय हे शैक्षणिक उपक्रम राबविणारे नगर जिल्ह्यातील नावाजलेले महाविद्यालय आहे. महाविद्यालयाने गांडूळ खत निर्मितीचा हा प्रकल्प सुरू करून परिसरातील शेतकऱ्यांच्या शाश्वत शेतीला नवसंजीवनी ठरेल असा हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचे रूपांतर भविष्यात लोक चळवळीत व्हावे, अशी आपली भावना आहे, यासाठी आपण मनापासून सहकार्य करू.

दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या संकल्पनेतून, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. दिग्विजय कुंभार यांनी प्रकल्पाचे नियोजन करून त्याच्या यशस्वीतेसाठी सतत प्रयत्न करतात.

दादा पाटील महाविद्यालय हे ग्रामीण भागातील उत्कृष्ट महाविद्यालय आहे. प्राचार्य डॉ बाळ कांबळे सर्वांच्या सहकार्यातून शैक्षणिक प्रगती बरोबरच विधायक उपक्रम राबवित असतात, अशी कौतुकाची थाप उपस्थितांनी या वेळी दिली.(Earthworm Fertilizer Project at Dada Patil College)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com