
-राजू नरवडे
संगमनेर: दाढ खुर्द (ता. संगमनेर) येथील राधिका राजेश गव्हाणे या तरुणीने गोमातेच्या शेणापासून पर्यावरणपूरक, सात्विक व शुद्ध अशा आकर्षक गणेशमूर्ती तयार करून समाजासमोर एक अनोखा व प्रेरणादायी संदेश ठेवला आहे. पुढील वर्षी तब्बल पाच हजार गणेशमूर्ती बनवण्याचा संकल्प गव्हाणे कुटुंबीयांनी केला आहे.