

Ahilyanagar fraud
sakal
अहिल्यानगर: नगरमधील तिघांची शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ७० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फसवणुकीची ही घटना २४ जून २०२४ ते २० डिसेंबर २०२४ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी श्रीगोंदे येथील आरोपीवर नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.