Ahmednagar News: कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया फक्त 'टार्गेट'साठी! FJFM हॉस्पिटलमध्ये अपुऱ्या व्यवस्था

जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आरोग्य विभागा अंतर्गत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया शिबिर भरविण्यात आले होते
FJFM
FJFM

अहमदनगर- जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आरोग्य विभागा अंतर्गत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया शिबिर भरविण्यात आले होते.. यासाठी अनेक गावातून प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या कार्यक्षेत्रातील गोरगरीब महिला रुग्णांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर नेवासा तालुक्यातील वडाळा येथील FJFM या हॉस्पिटल मध्ये घेण्यात आले.(Family Welfare Planning Surgery only for Target Inadequate arrangements at FJFM Hospital Ahmednagar)

रुग्णांची कुठल्याही प्रकारची सोय नसताना तसेच पुरेसे बेड उपलब्ध नसताना देखील आरोग्य यंत्रणेने फक्त त्यांच्या केसेस टार्गेट साठी दीडशे हून अधिक ऑपरेशन केल्याची उघड झाले आहे. नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आणला असून शनिवारी मध्यरात्री झालेला प्रकार समोर आणलाय. एकीकडे पाऊस, त्यात लाईट गेलेली आणि अपुरी बेड व्यवस्था यामुळे अनेक महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपण्याची वेळ आल्याचं यातून समोर आलय.

FJFM
Ahmednagar News : मयत व्यक्तीची जमीन विकली; बनावट मुखत्यारपत्र तयार केले; फसवणुकीचा गुन्हा दाखल

वास्तविक पाहता रुग्णांना पूर्ण सुविधा, बेड तसेच लाईट आणि पाणी सुविधा असेल तरच ऍडमिट करण्यात येते. परंतु FJFM हॉस्पिटल येथे अपुरी सुविधा असून देखील हे हॉस्पिटलच का निवडले गेले असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.यात हॉस्पिटल व्यवस्थापन बरोबर संपर्क साधला असता त्यांची बाजू उद्या मांडणार असल्याचं त्यांनी सांगत आज प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. तसेच आज रविवार सुट्टी असल्याने शासकीय अधिकारी यांची देखील प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com