कांदा चाळीचे अनुदान मिळण्यासाठी कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण

Farmers agitation in front of District Agriculture Superintendent Office
Farmers agitation in front of District Agriculture Superintendent Office

अहमदनगर : कृषी विभागाने पुर्वपरवानगी दिल्यानंतर २०१८- १९ या वर्षात कांदा चाळीची उभारणी केली. त्याचे अनुदान मिळावे व कांदा चाळ तपासणीच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

या मागणीसाठी शेतकऱ्यांनी येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण दुसऱ्यादिवशीही सुरुच आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

नगर जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात कृषी विभागाच्या पुर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने कांदाचाळ उभारणी केली. मात्र त्यानंतर त्याचे अनुदान देण्याला अद्याप टाळाटाळ केली जात आहे. याबाबत सातत्याने कृषी विभागाशी संपर्क केला असता त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सोमवारपासून येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर नेवासा तालुक्यातील अनिल विधाटे, ॲड. पांडुरंग औताडे, रमेश जगताप, गिताराम रोडगे, नवनाथ मते, बापूसाहेब घोलप, दशरथ चव्हाण, विनायक विधाटे, रविंद्र होले यांच्यासह शेतकऱ्यांनी अमरण उपोषण सुरु केले आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कांदाचाळ अनुदान मिळावे याबाबत पाठपुरावा केल्यानंतर कृषीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा कांदा चाळ तपासणी करण्याला सुरवात केली. मात्र तपासणीच्या नावाखाली अधिकारी शेतकऱ्यांना वेठीस धरत असून पैसे वसुल करत असल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे. कृषी भागातील अधिकारी शेतकऱ्यांना वठीस धरत असताना वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पैसे घेणाऱ्या कृषीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई करावी आणि रखडलेले अनुदान तातडीने मिळावे.

मागण्या मान्य होईपर्यत उपोषण सुरुच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनीन सांगितले. दरम्याण दोन दिवसापासून कार्यालयाच्या दारात थंडीत उपोषण करत असतानाही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्‍याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील, ॲड. सयाराम बानकर पाटील यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.

संपादन : अशोक मुरुमकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com