
नेवासे तालुका अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने भेंडे ते कुकाणे अशी तिरंगा ट्रॅक्टर रॅली काढली.
नेवासे (अहमदनगर) : शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी मंगळवार दिल्लीत निघालेल्या शेतकऱ्यांच्या तिरंगा रॅलीला सक्रिय पाठिंबा म्हणून नेवासे तालुका अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने भेंडे ते कुकाणे अशी तिरंगा ट्रॅक्टर रॅली काढली.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
किसान सभेचे नेते बाबा आरगडे, ऍड. बन्सी सातपुते, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अंकुश कानडे, शरद आरगडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या तिरंगा ट्रॅक्टर रॅलीचा प्रारंभ भेंडे येथील बसस्थानक परिसरातून झाला. तर कुकाणे येथे पोहचल्यानंतर पोलिस मैदानावर सभा झाली. त्यात बाबा आरगडे, कानडे, सातपुते यांची भाषणे झाले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिलेल्या निवेदनात 'सध्या दिल्लीच्या सगळ्या सिमावर दोन महिन्यापासून शेतकरी ठिया आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी दखल घेत नाही. आजपर्यंत या आंदोलनात 200 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. त्यामुळे दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून अखिल भारतीय सभेच्या नेवासा वतीने शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्यात यावे व डिझेलचे दर कमी झाले पाहिजेत असे म्हंटले आहे.
आंदोलनात ज्येष्ठ नेते आपसाहेब वाबळे, बाळासाहेब जावळे, बंडू आरगडे यांच्यासह एकूण २५ ट्रॅक्टर व शेकडो शेतकरी सहभागी होते. रॅलीची सांगता भेंडे बसस्थानक परिसरात झाली