
तिची सुरवातीपासुन सैन्यदलात भरती होण्याची जिद्द होती. ती तिने पूर्ण केली. शेतकऱ्याची पोर नांगरासोबत आता हाती बंदूक धरून देशाचे संरक्षण करणार आहे.
टाकळी ढोकेश्वर ः आता असे कुठलेच क्षेत्र नाही की ज्यात महिला नाहीत. मुलींच्या बाबतीत ग्रामीण भागात एकेकाळी बाहेर पाठवायला नकार असायचा. सैन्य दल तर केवळ पुरूषांचीच मक्तेदारी असायचे. आता त्यात महिला कमांडोही दिसत आहेत. रांधे गावातील शेतकऱ्याची मुलगी शत्रूसोबत फाईट करताना दिसणार आहे.
वैशालीचे शिक्षण पहिली ते दहावी लोणीमावळा या गावात झाले. अकरावी ते बारावीचे शिक्षण तिने वडझिरे गावात पूर्ण केले. पुढील शिक्षण अळकुटी गावातील विद्यालय गाठले. सध्या तिचे एम.ए.चे शिक्षण सुरू आहे.
हेही वाचा - पुणे, नगरसह सर्वच कॅन्टोन्मेंट बरखास्त
तिची सुरवातीपासुन सैन्यदलात भरती होण्याची
जिद्द होती. ती तिने पूर्ण केली. शेतकऱ्याची पोर नांगरासोबत आता हाती बंदूक धरून देशाचे संरक्षण करणार आहे.
रांधे (ता.पारनेर) येथील वैशाली गेणभाऊ आवारी सैन्यात राष्ट्रीय सीमासुरक्षा दलासाठी असणारी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ती भारताच्या सीमेवरील सुरक्षा विभागात रूजू होणार आहे. सैन्यात भरती होणारी गावातील ती पहिली मुलगी आहे. याबद्दल ग्रामस्थांनी तिचा सन्मान केला.
या वेळी माजी उपसरपंच संतोष काटे, भगवान पावडे, संतोष लामखडे, विनोद फापाळे, प्रवीण साबळे, संतोष साबळे, साईनाथ झिंजाड उपस्थित होते.
संपादन -अशोक निंबाळकर