बळीराजाचे डिजीटल पाऊल, दिवसात ७२ हजार सात-बारा डाउनलोड

सातबारा उतारा
सातबारा उतारा

संगमनेर ः राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी ऑनलाईन सात-बारा ही संकल्पना राबवून संगणकीकृत केले. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी (ता. 21 ) राज्यात एकाच दिवसात तब्बल बहात्तर हजार सातशे नागरिकांनी सात-बारा उतारा डाउनलोड केल्याने एक मोठा विक्रम महसूल विभागाच्या नावावर नोंदला गेला आहे.(Farmers in Maharashtra went digital)

सातबारा उतारा
मी पस्तीस वर्षे हटत नसतो, आमदार लंकेंनी सांगितला राजयोग

बाळासाहेब थोरात यांनी मागील महसूल मंत्रीपदाच्या काळात या विभागाला हायटेक केले. तसेच विद्यार्थ्यांना शाळेतच ऐंशी लाख दाखले देण्याच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे महसूल विभागाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येसुद्धा नोंद झाली आहे. आता नव्याने या विभागाचा कार्यभार सांभाळताना थोरात यांनी सामान्य माणसाच्या सोयीकरता महसूल विभागात ऑनलाईन सातबारा, इ फेरफार, ई-मोजणी असे विविध उपक्रम राबवले.

सोमवारी राज्यात 72 हजार 700 डिजिटल स्वाक्षरी सातबारा आणि खाते उतारे डाउनलोड झाले आहे. राज्य सरकारला 23 लाख रुपयांचा महसूल एका दिवसात प्राप्त झाला आहे. सामान्य शेतकर्‍यांना केव्हाही आणि कुठेही सातबारा व खाते उतारे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या महाभूमी संकेतस्थळावरून सोमवार ( ता. 21 जून) रोजी आत्तापर्यंतची उच्चांकी सेवा देण्यात आली. यापूर्वी एका दिवसात 62 हजार उतारे डाऊनलोड झाले होते.

हा विक्रम मोडीत काढताना राज्य सरकारच्या ऑनलाईन सातबारा या महत्व पूर्ण योजनेला चांगले यश मिळत आहे. महसूल विभागाकडून सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्याने नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. (Farmers in Maharashtra went digital)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com