

One killed, two seriously injured in a violent head-on bike collision at Baragaon Nandur.
Sakal
राहुरी : बारागाव नांदूर येथे शनिवारी (ता. ८) सकाळी साडेदहा वाजता दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका पंधरा वर्षांच्या जखमी मुलाचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले, तर तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आदित्य शशिकांत बर्डे (वय १५, रा. बारागाव नांदूर) असे मृताचे नाव आहे. शेखर किशोर माळी (वय १९, रा. राहुरी खुर्द) व सोमनाथ नामदेव शिंदे असे गंभीर जखमींचे नाव आहे.