esakal | वरिष्ठ महिला अधिकारीचा विनयभंग; थेट कार्यालयात जवळीक साधण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra police

वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

शेवगाव (जि.अहमदनगर) : येथील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा फोन, संदेशाद्वारे व प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन विनयभंग केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी विशाल विजयकुमार बलदवा (रा. मारवाड गल्ली, शेवगाव) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. याबाबत फिर्यादीत असे म्हटले आहे की.... (Filed-case-molestation-of-senior-female-officer-marathi-news-jpd93)

अश्लील व अर्वाच्य भाषेत बोलून मानसिक त्रास

शेवगाव येथे शासकीय पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मे २०२० पासून संबंधित व्यक्ती कार्यालयात चकरा मारून व फोनद्वारे ओळख वाढवत आहे. कार्यालयात येऊन ‘मी अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यास मदत करतो, त्यातून येणारे पैसे तुम्हास पोच केले जातील,’ असे म्हणून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ‘कार्यालयीन काम असेल तेवढेच बोला; इतर वैयक्तिक बाबींची चर्चा करू नका,’ असे त्यास फोनवरून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने अश्लील भाषा वापरली. त्यानंतर कार्यालयीन कामकाजात माझ्याविरोधात वरिष्ठांकडे वेगवेगळे अर्ज देऊन त्रास देऊ लागला. उपोषण व इतर आंदोलनांच्या नावाखाली माझ्याविरुद्ध विचित्र मजकूर सोशल मीडियावर पाठवून माझी व कुटुंबाची बदनामी केली. पती व मुलीबद्दल फोनवर अश्लील व अर्वाच्य भाषेत बोलून, पतीला संदेश पाठवून मानसिक त्रास दिला.

हेही वाचा: भंडारदरा पाणलोटात धुवाधार पाऊस; कोथळे धरण ‘ओव्हर-फ्लो’

हेही वाचा: दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पोलिसांवर हल्ला

loading image