Fire News: बालिकाश्रम रस्त्यावर आगीत तीन दुकाने भस्मसात; लाखो रुपयांचे नुकसान

Ahmednagar: जगदंबा बाईक्स हे दुकान पंकज उदमले यांच्या मालकीचे होते. पत्र्याच्या शेडमध्ये ही तिन्ही दुकाने आहेत
Fire News: बालिकाश्रम रस्त्यावर आगीत तीन दुकाने भस्मसात; लाखो रुपयांचे नुकसान
Fire Newssakal

Ahilya Nagar: शहरात बालिकाश्रम रोडवर आग लागून तीन दुकाने खाक झाली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज महापालिकेच्या अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, पत्रकार चौकाजवळील इमारतीला आग लागल्याची घटना ताजी असतानाच बालिकाश्रम रोडवर आज दुसरी घटना घडली.

बालिकाश्रम रोडवरील सिद्धार्थनगरजवळ एकाच ठिकाणी चप्पल, वेल्डिंग आणि दुचाकी रिपेअरिंगचे दुकान आहे. यश फॅब्रिकेशन हे दुकान विजय मळेकर यांच्या मालकीचे होते. वैष्णवी फुटवेअर हे दुकान तुळशीराम गारदे यांचे, तर जगदंबा बाईक्स हे दुकान पंकज उदमले यांच्या मालकीचे होते. पत्र्याच्या शेडमध्ये ही तिन्ही दुकाने आहेत.

Fire News: बालिकाश्रम रस्त्यावर आगीत तीन दुकाने भस्मसात; लाखो रुपयांचे नुकसान
Ahmednagar Crime : आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित होणार; महावितरणच्या नावाने फसवणुकीचा नवा फंडा

सोमवारी सायंकाळी उदमले यांच्या जगदंब बाईक्स या दुकानात इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे दुकानांना आग लागली. त्यात चप्पलचे दुकान, दुचाकी रिपेअरिंग आणि वेल्डिंगचे दुकान आगीत जळून खाक झाले. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली.

अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत तिन्ही दुकाने जळून खाक झाली होती. दरम्यान, आगीच्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे बालिकाश्रम रस्त्यावर काही वेळासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक काळे, चिंधू काळे, सुजित घुंगार्डे, मनोज रासकर, संदेश सांगळे, सागर जाधव, रवींद्र साठे यांनी ही आग आटोक्यात आणली.

Fire News: बालिकाश्रम रस्त्यावर आगीत तीन दुकाने भस्मसात; लाखो रुपयांचे नुकसान
Ahmednagar News : कांद्याचे कोसळलेले भाव, दूध दर कपातीच्या निषेधार्थ नीलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली आंदोलनस्‍थळी थापल्या भाकरी

प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा

महापालिकेचा अग्निशमन विभाग साधन सामग्रीने हायटेक झाला आहे. फोम टेंडर, वॉटर टेंडर, रेस्क्यू व्हॅन, मिनी टेंडर अशी चार वाहने या विभागाच्या दिमतीला आहे. काही दिवसांपूर्वीच एक नवीन मल्टीपर्पज अग्निशमन गाडी या विभागाला मिळाली आहे. परंतु, पुरेसे आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही.

शहरातील मोठ्या इमारतींचे दरवर्षी फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे. फायर ऑडिट न करणाऱ्या इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी आग लागू नये, याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

- एस. यू. मिसाळ, प्रमुख, अग्निशमन विभाग.

Fire News: बालिकाश्रम रस्त्यावर आगीत तीन दुकाने भस्मसात; लाखो रुपयांचे नुकसान
Ahmednagar-Kopargaon NH : राष्ट्रीय मार्गाच्या कामासाठी ठाकरे गट आक्रमक; राहुरीत गुरुवारी ‘रस्ता रोको’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com