प्रथमोपचार केंद्र कुलूपबंद, जिल्हा परिषद निवासस्थानातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य वाऱ्यावर

दौलत झावरे  
Tuesday, 5 January 2021

शहरातील लाल टाकी परिसरात जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 50 निवासस्थाने बांधली आहेत. त्यातील 34 निवासस्थाने कर्मचारी वापरतात. तसेच पदाधिकाऱ्यांची पाच निवासस्थाने आहेत.

अहमदनगर : शहरातील लाल टाकी परिसरात जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रथमोपचार केंद्र सुरू केले होते. मात्र, मागील 10 वर्षांपासून हे केंद्र कुलूपबंद आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरातील लाल टाकी परिसरात जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 50 निवासस्थाने बांधली आहेत. त्यातील 34 निवासस्थाने कर्मचारी वापरतात. तसेच पदाधिकाऱ्यांची पाच निवासस्थाने आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी येथील दोन खोल्यांमध्ये प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आले. याच केंद्रात कर्मचारी व कुटुंबीयांवर प्रथमोपचार करण्यात येत होते. मात्र, मागील 10 वर्षांपासून हे केंद्र बंद आहे. ते पूर्ववत करण्याबाबत प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आजारपणात कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे तातडीने हे केंद्र सुरू करावे, तसेच जिल्हा परिषदेत नव्याने प्रथमोपचार केंद्र सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंके यांनी केली आहे. 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी असलेले, तसेच जिल्हा परिषद मुख्यालयातही नव्याने प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. 
- प्रताप शेळके, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद 

जिल्हा परिषद मुख्यालयात सुमारे साडेचारशे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील अनेकांना आजाराने घेरले आहे. अचानक आजार उद्‌भवल्यास मुख्यालयात तातडीने उपचार मिळणे गरजेचे आहे. कर्मचारी निवासस्थानातील प्रथमोपचर केंद्र तातडीने सुरू करावे. 
- संदेश कार्ले, सदस्य, जिल्हा परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first aid center in Ahmednagar city has been closed for the last 10 years