बातमी साहित्य वर्तुळातील ः यंदा प्रथमच विखे पाटील साहित्य पुरस्काराबद्दल झालाय हा निर्णय

रवींद्र काकडे
Monday, 27 July 2020

साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या या राज्यस्त‍रीय साहित्य पुरस्काराचे वितरण करण्याची परंपरा मागील 29 वर्षापासुन प्रवरा परिवाराने कायम ठेवली आहे.मात्र, यंदा... 

लोणी : (जि. अहमदनगर) सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने दरवर्षी आयो‍जित करण्यात येणारा राज्यस्तरीय साहित्य जीवन गौरव आणि कला गौरव पुरस्कार समारंभाबाबत यंदा असा निर्णय घेण्यात आला आहे.  

साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या या राज्यस्त‍रीय साहित्य पुरस्काराचे वितरण करण्याची परंपरा मागील 29 वर्षापासुन प्रवरा परिवाराने कायम ठेवली आहे. यंदा पद्मश्रींचा 120 वा जयंती दि‍न ता. 3 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी आहे.

कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे जाहीर कार्यक्रम आणि समारंभ आयोजित करण्यास निर्बंध असल्यामुळे यावर्षी जयंतीदिन समारंभ आणि साहित्य व कला गौरव पुरस्कार स्थगित करण्याचा निर्णय साहित्य पुरस्कार वितरण समिती आणि कार्यक्रम संयोजन समितीच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे सांगण्यात आले.

हेही वाचा - शंभर फूट विहिरीत कोसळली वीज अन क्षणात

यावर्षी जयंतीदिनाच्या निमित्ताने कोणतेही जाहीर कार्यक्रम न करता प्रवरानगर येथील स्मृतीस्थळावर अभिवादनाचा कार्यक्रम होईल. यावर्षीचे साहित्य व कला गौरव पुरस्कार एकत्रितपणे पुढील वर्षी देण्याचा निर्णयही पुरस्कार निवड समिती आणि कार्यक्रम संयोजन समितीतर्फे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे आणि कारखान्याचे कार्यकारी सचांलक ठकाजी ढोणे यांनी सांगितले.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the first time this year, a decision has been taken about the Vikhe Patil Sahitya Puraskar