गंगापूरमधील मासे का मेले, लोकांनी लावले नाकाला रूमाल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 December 2020

चिंचोली, कुरणपूर, गंगापूर, मांडवे, गळनिंब, फत्याबाद येथील ग्रामस्थांना दळण-वळणासाठी गंगापूर बंधाऱ्यावरील रस्ता जवळचा मार्ग आहे.

राहुरी : गंगापूर (ता. राहुरी) येथील प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात मळीमिश्रित पाणी सोडल्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झाला. मृत मासे पाण्यावर तरंगत असून, त्याची दुर्गंधी सुटल्याने परिसरातील पाच-सहा गावांतील नागरिक हैराण झाले आहेत. 

चिंचोली, कुरणपूर, गंगापूर, मांडवे, गळनिंब, फत्याबाद येथील ग्रामस्थांना दळण-वळणासाठी गंगापूर बंधाऱ्यावरील रस्ता जवळचा मार्ग आहे. त्यामुळे बंधाऱ्यावरील रस्त्यावर कायम वर्दळ असते. दूषित पाण्याच्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थांना नाकाला रुमाल लावूनच बंधाऱ्यावरून जावे लागते.

हेही वाचा - महादेव जानकरांना दोन खासदार, ५० खासदार निवडून आणायचेत

बंधाऱ्यातील दूषित पाण्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या माशांची व पाण्याची दुर्गंधी आसपासच्या पाच-सहा गावांमध्ये पसरली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. दूषित पाणी पिल्यामुळे नागरिक व जनावरे आजारी पडण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी सरपंच सतीश खांडके यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fish in Gangapur dam died due to contaminated water