
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यागी यांनी कुकाणे (ता.नेवासे) ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची समन्वय बैठक घेतली.
कुकाणे : आदर्श आचार संहितेचे पालन करून ग्रामपंचायत निवडणुका लोकशाही पद्धतीने शांततेत पारपाडा, अन्यथा कायदा हातात घेणारांची गय केली जाणार नाही असा इशारा नेवासे पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी यांनी केले. एकंदर त्यांनी कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल असाच इशारा दिला.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यागी यांनी कुकाणे (ता.नेवासे) ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची समन्वय बैठक घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच दौलत देशमुख, अमोल अभंग, एकनाथ कावरे, कारभारी गोर्डे, मुसा इनामदार, जवाहर भंडारी, अनिल गर्जे, भारत गरड प्रमुख उपस्थितीत होते.
हेही वाचा - मॅनेजरने कॅशिअर तरूणीवर अत्याचार करीत १६ लाख लांबवले
अभिनव त्यागी म्हणाले, " समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जबाबदारी सर्वांचीच आहे. यासाठी सर्वांनी प्रशासनास मदत करावी, पोलीस प्रशासनाचे सर्वांना सहकार्ये आपल्याला राहील. यावेळी अमोल अभंग, अनिल गर्जे आदीनी मनोगत व्यक्त करत होणारी ग्रामपंचायत निवडणूक शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पारपाडण्याची ग्वाही दिली.
यावेळी त्यागी यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थानतीच्या वतीने प्रशासक सुशील माळवदे, ग्रामविकास अधिकारी सुभाष गर्जे यांनी सत्कार केला.