

Forest officials and animal activists after safely capturing the leopard in Loni Budruk; another leopard was seen roaming around the cage.
Sakal
कोल्हार : लोणी बुद्रूक (ता. राहाता) येथील हळपट्टी शिवारात पहाटे पाचच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद झाला. दुसरा बिबट्या पिंजऱ्या भोवती चक्कर मारताना दिसला. जनसेवा कार्यालय जवळील माधुरी सुनील वाबळे यांच्या गट नंबर ४७२ शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये साधारण १४ वर्ष वयाचा नर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग व प्राणीमित्रांना यश आले. गेल्या १५ दिवसांपासून पिंजऱ्याला तो हुलकावणी देत होता.