
व्यायामाशिवाय पर्याय नाही. राज्यातील अनेक मंत्री साहेबांना आपल्या घरातील व्यायाम शाळेचा पहाणी करुन व्यायामाचे महत्व पटवून दिले. निरोगी आरोग्यासाठी आपल्या वयानुसार रोज व्यायाम करणे गरजेचे आहे.
श्रीरामपूर (अहमदनगर) : व्यायामाशिवाय पर्याय नाही. राज्यातील अनेक मंत्री साहेबांना आपल्या घरातील व्यायाम शाळेचा पहाणी करुन व्यायामाचे महत्व पटवून दिले. निरोगी आरोग्यासाठी आपल्या वयानुसार रोज व्यायाम करणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या संकटात सर्वांना व्यायाम आणि आरोग्याचे महत्व कळाले. त्यामुळे कोरोनाच्या संकटावर मात करायची असेल तर नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. सकाळी लवकर उठुन व्यायाम करणे आरोग्यासाठी लाभदायी असल्याचा सल्ला माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना दिला आहे.
हेही वाचा : उच्च अधिकारीपदावर कार्यरत असणाऱ्या तरुण- तरुणीने केले अवघ्या दोन रुपयांत लग्न
दोंन्हीही मंत्री महोदयांनी माजी आमदार मुरकुटे यांच्या निवास्थानातील व्यायाम शाळेची पहाणी करुन व्यायामाचे महत्व जाणुन घेतले. यावेळी माजी आमदार मुरकुटे यांनी राज्यमंत्री गडाख आणि तनपूरे यांना व्यायामाचे धडे दिले. वयाच्या ७९ व्या वर्षी आजही आपण नियमित व्यायाम करतो. निवास्थानातील व्यायाम शाळेत जावून रोज पहाटे एक तास व्यायाम करतो. त्यानंतर क्रीडा मैदान परिसरात सायकलवरुन फेरफटका मारुन धावतो. त्यामुळे आजही आपले आरोग्य चांगले असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले.
शरीरासाठी आराम हा हराम असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आपण सातत्याने नियमित व्यायाम करायला पहिजेत. रोजचे काम वेळेवर करायला पाहिजे. आपण प्रत्येक रविवारी शेतात जावून शेतीची कामे करतो. शेतात काम केल्याने मनाला समाधान वाटते. आजचे अनेक शेतकरी शेतात जात नाही. शेतात काम करण्यास पुढाकार घेत नाही.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
माणसाने आयुष्याच्या शेवटपर्यंत काम केले पाहिजे. त्यामुळे अनेकदा विविध मंत्र्यांसह अनेकांना व्यायाम करण्यास प्रोत्साहीत करण्याचे कार्य करतो. माझा व्यायामाचा सल्ला ऐकायचा असेल तर ऐका असा सल्ला मुरकुटे यांनी दिला दिला आहे. त्यावर मंत्री गडाख म्हणाले, साखर कारखाने सर्वांकडे आहेत. परंतू माजी आमदार मुरकुटे यांच्याकडे आपली व्यायामशाळा आहेत.
वयाच्या ७९ व्या वर्षीही त्यांनी आपले आरोग्य उत्तम ठेवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपणही नियमित व्यायाम करतो. आपल्याला माहीत नाहीत. आपण वयाच्या ७० ते ८० वर्षापर्यंत मुरकुटे यांच्या सारखा आपण व्यायाम करु शकणार की नाही. परंतू व्यायाम करणे सर्वांना गरजेचे असून मुरकुटे यांचे मार्गदर्शन मोलाचे असल्याचे मंत्री गडाख यांनी स्पष्ट केले.
संपादन : अशोक मुरुमकर