माझी समोरासमोर बसून सांगण्याची हिंमत आहे, तुमची

शांताराम काळे
Sunday, 19 July 2020

राजकीय पोळी भाजली म्हणजे झाले का? ती भाजण्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी काम करतात काय? हे नागरिकांनी पाहणे आवश्‍यक आहे, असे आवाहन करत राजूर ग्रामपंचायत पावसाळ्यात विध्यार्थ्यांना व रुग्णांना जाण्यासाठी मुरूम टाकते.

अकोले (अहमदनगर) : राजकीय पोळी भाजली म्हणजे झाले का? ती भाजण्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी काम करतात काय? हे नागरिकांनी पाहणे आवश्‍यक आहे, असे आवाहन करत राजूर ग्रामपंचायत पावसाळ्यात विध्यार्थ्यांना व रुग्णांना जाण्यासाठी मुरूम टाकते. नागरिकांचे हे सेवक म्हणणारे त्याला विरोध करून राजकीय द्वेषभावनेतून अधिकाऱ्यांना फोन करून कारवाई करण्याचे आदेश देतात, असे होत असेल तर नागरिकांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. हे त्यानी विसरू नये, असे वक्तव्य माजी आमदार वैभव पिचड यांनी माध्यमांशी बोलताना काढले.

हेही वाचा : पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना पाथर्डीत भाजपच्या कार्यकारणीत डावलले
तालुक्यातील अधिकाऱ्यांनी कामे करताना दर्जा टिकऊन कामे करावीत. जनतेचा पैसे वाया जाता  कामा नये. प्रत्येक लाभार्थ्याला लाभ कसा मिळेल त्यात दुजाभाव न करता त्याची तालुक्यातील अधिकाऱ्यांनी अमलबजावणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक ग्रामपंचायत त्यांच्या पद्धतीने काम करीत असताना त्यात हस्तक्षेप करून काम थांबवून तालुक्यात चुकीचा पायंडा कुणी पाडत असेल व घाणेरडे राजकारण करीत असेल व विकासाच्या कामात अडथळा आणू नये.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राज्य सरकारकडून किती निधी मंजूर करून आणला व मागील अर्थसंकल्पातील किती कामे सुरु आहेत. नऊ महिन्यात मंजूर करून आणलेली कामे, निधी व माझ्या कार्यकाळात मागील अर्थ संकल्पात मंजूर झालेला निधी, वर्क ऑर्डर याचा लेखजोखा जनतेसमोर लोकप्रतिनिधींनी द्यावा. माझी समोरासमोर बसून सांगण्याची हिंमत आहे. माझ्या कार्यकाळात अधिक कामे मंजूर करून आणले व त्यांनी किती कामे मंजूर केले. तेही जनतेसमोर मांडावीत केवळ राजकीय द्वेषाचे कामे करू नयेत . तालुक्यात कोरोनाचे संक्रमण सुरु असून जनतेने आपली काळजी घेऊन घरात बसावे. तुम्ही सुरक्षित तर देश सुरक्षित राहील, असे आव्हानही पिचड यांनी केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Vaibhav Pichad interacts with journalists in Akole taluka