पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना पाथर्डीत भाजपच्या कार्यकारणीत डावलले

राजेंद्र सावंत
Sunday, 19 July 2020

भाजपच्या तालुका कार्यकारीनीत पंकजा मुंडे यांच्या समर्थक व युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष अमोल गर्जे व ज्येष्ठ नेते अशोक गर्जे यांना डावलले आहे. विधानसभेला आमदार मोनिका राजळे यांच्या उमेदवारीला थेट विरोध कऱणारे अमोल गर्जे, संजय बडे, सुनिल पाखरे यांना संघटनेत बेदखल करण्यात आले आहे. 

पाथर्डी (अहमदनगर) : भाजपच्या तालुका कार्यकारीनीत पंकजा मुंडे यांच्या समर्थक व युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष अमोल गर्जे व ज्येष्ठ नेते अशोक गर्जे यांना डावलले आहे. विधानसभेला आमदार मोनिका राजळे यांच्या उमेदवारीला थेट विरोध कऱणारे अमोल गर्जे, संजय बडे, सुनिल पाखरे यांना संघटनेत बेदखल करण्यात आले आहे. 

येथील खुनशी राजकाणामुळे भाजपा संघटनेचे नुकसान होण्याची भिती येथील जुने भाजपा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. यामुळे भाजपामधे नाराजी उफाळुन आली आहे. भारतीय जनता पक्षाची जम्बो कार्यकारीणी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यानी जाहीर केली आहे. यामधे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, संजय बडे, सुनिल पाखरे, नागनाथ गर्जे यांना डावलण्यात आले. सुनिल पाखरे व नागनाथ गर्जे यांनी याबाबत पत्रक प्रसिद्ध करुन भाजपाच्या मुळ निष्ठावंताना डावलले असुन मुंडे समर्थकांची कोंडी केल्याची भावना व्यक्त केली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आगामी काळात आमदार राजळे यांना जाहीरपणे विरोध करुन त्यांना हे खुनशी राजकारण महागात पडेल, असा इशारा पाखरे व गर्जे यांनी दिला आहे. ज्येष्ठ नेते अशोक गर्जे हे स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांचे समर्थक आहेत. पक्ष संघटनेत अनेक पदावर त्यांनी काम केले. त्यांचा मुलगा अमोल गर्जे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाअध्यक्ष म्हणुन काम पाहत होते. त्यांना बाजुला करण्यात आले आहे. पाखरे व गर्जे यांनी निवेदन नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाला यामुळे संघटना पातळीवर नाराजीला सामोरे जावे लागणार आहे. तालुक्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना अशी आघाडी झाल्याने भाजपाला येथे समर्थ विरोधक तयार झाला आहे. त्यात अंतर्गत गटबाजीला उधान आल्याने भाजपाला त्याचा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

आम्ही भाजपाचे व मुंडे समर्थक म्हणुन काम करीत अहोत. आमदार मोनिका राजळे यांनी आम्हाला टाळले आहे. मात्र आम्ही भाजपाचेच अहोत. वेळ येईल तेव्हा नाराजी व्यक्त करु. आज संघटनेत त्यांचा वरचष्मा असला तरी मुंडे समर्थकांना डावलणे त्यांना अडचणीचे ठरेल.
- सुनिल पाखरे, भाजपा कार्यकर्ते, पाथर्डी

 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The politics story of Pankaja Munde supporters have in Pathardi no chance