टेम्पोने बैलगाड्यांना उडवले; चार तोडणी मजूर, तीन बैल गंभीर

संजय आ. काटे
Tuesday, 15 December 2020

टेम्पोचालक भास्कर जगन्नाथ ठाकरे (रा. साक्री, जि. धुळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच महामार्गावर लोणी व्यंकनाथ शिवारात, चार दिवसांपूर्वी मालमोटारीच्या धडकेत चार तरुणांचा बळी गेला आहे. 

श्रीगोंदे : भरधाव जाणाऱ्या टेम्पोने ऊस घेऊन जाणाऱ्या दोन बैलगाड्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात चार ऊसतोडणी मजूर व तीन बैल गंभीर जखमी झाले. नगर-दौंड महामार्गावरील ढोकराई फाट्याजवळ आज (मंगळवारी) पहाटे हा अपघात झाला. 

रामदास गोरख महाजन, मनीषा रामदास महाजन, बाबासाहेब नागरगोजे, सुनीता नागरगोजे (रा. खिळद, ता. आष्टी, जि. बीड) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांना दौंडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. बैलगाड्यांची मोडतोड झाली आहे.

हेही वाचा - देवदैठणच्या सराफ पेढीतून तीन किलो चांदी चोरीला

नागवडे साखर कारखान्यावर ऊस भरण्यासाठी पहाटे बैलगाड्या काष्टीकडे जात होत्या. या वेळी मागून आलेल्या टेम्पोने (एमएच-12, एफझेड 5736) बैलगाड्यांना जोराची धडक दिली.

टेम्पोचालक भास्कर जगन्नाथ ठाकरे (रा. साक्री, जि. धुळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच महामार्गावर लोणी व्यंकनाथ शिवारात, चार दिवसांपूर्वी मालमोटारीच्या धडकेत चार तरुणांचा बळी गेला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four sugarcane workers and three oxen were injured in the tempo collision