
Police arrest gang involved in 15 temple thefts across Ahilyanagar and Kolhapur; stolen idols and ornaments recovered.
Sakal
अहिल्यानगर: अहिल्यानगर व कोल्हापूर जिल्ह्यांतील १५ मंदिरे फोडून दानपेट्यांवर डल्ला मारणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. राहुल किशोर भालेराव (रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) हा टोळीचा म्होरक्या असून, चौघांना अटक केली आहे. या टोळीतील चार जण पसार झाले आहेत. ही टोळी मागील एक वर्षापासून मंदिरे फोडत होती. करोडी (ता. पाथर्डी) येथील शनिमारुती मंदिरातील दानपेटी फोडल्यानंतर या टोळीवर शनीचा कोप झाला अन् टोळी जेरबंद झाली.